दि.14/11/2025|शाळेत बालदिन उत्साहात साजरा|
Автор: Saraswati mandir sec. school kalyan
Загружено: 2025-12-14
Просмотров: 250
पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सरस्वती मंदिर माध्यमिक कल्याण पश्चिम येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि नियोजन इयत्ता पाचवीच्या वर्ग शिक्षिका समृद्धी काळे यांनी सविता खुसपे यांनी केले होते. या कार्यक्रमाला श्री. कांताराम महानवर सर आणि श्री. विनीत पाचपांडे सर हे सहशिक्षक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. श्री. महानवर सर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व सांगितले.
याप्रसंगी विविध प्रकारचे खेळ व गाणे यांचे
आयोजन व नियोजन करण्यात आले होते. एकंदरीत हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया पाटील मॅडम आणि सर्व शिक्षक यांचे सहकार्य विशेष लाभले होते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: