Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

जंगलात आकूर भाजी जमवताना आला मुसळधार पाऊस | कोकणातल्या रानभाज्या | Aakur Ranbhaji | Kokankar Avinash

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2024-06-15

Просмотров: 35899

Описание:

जंगलात आकूर भाजी जमवताना आला मुसळधार पाऊस | कोकणातल्या रानभाज्या | Aakur Ranbhaji | Kokankar Avinash

आज मंडळी दुपारी प्लॅन झाला आकूर नावाची रानभाजी जंगल जाऊन आणण्याचा. सह्याद्रीत डोंगरदऱ्यात मिळणारी हि भाजी. हिरव्या-मातकट रंगाचे आकुराचे हे कोंब अर्ध्या हाता एवढेच वाढतात. तेवढेच कोवळे असताना ते बाजारात येतात. या दिवसांत कोकणातल्या स्वयंपाकघरात ही भाजी अवश्य शिजते. जंगलात जाऊन आकुर आणणे म्हणजे त्याची तुम्हाला माहिती हवी. मी आणि प्रमोद अंकुर काढत होतो तेवढ्यात पावसाने पण हजेरी लावली. थोडा वेळ वाट बघितली आणि धावतच घर गाठले. घरी पोचलो आणि मुसळधार पाऊस आला.

#Ranbhaji #ForestVegetables #KokanForest #MusaldharPaus

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
_________________________________________________________________________________________________

पावसाळी हवा थोडी रुळली की, हवेत छान गारवा पसरतो. सदा सर्वकाळ हिरवागार असणारा इथला परिसर या काळात हिरव्या रंगाच्या विविध छटा घेऊन येतो. जणू काही मऊशार, कोवळ्या पोपटी रंगाची शाल पांघरली असावी, असा भास होत राहतो.

कोकणात वर्षा ऋतूमुळे निसर्गात घडू लागलेला बदल थेट जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचतो. ऋतू बदलाची चाहूल स्वयंपाकघरात शिजणाऱ्या पदार्थावरूनही लक्षात येते. हा काळ असतो पावसाळी रानभाज्यांचा. पावसाच्या पाण्यावर उगवणाऱ्या भाज्यांची गृहिणी वाट बघत असतात.

मुद्दाम भाजी मंडईत चक्कर मारावी, असाच हा काळ असतो. पुण्या-मुंबईमध्ये सहजपणे बघायला मिळणार नाहीत, अशा अनेक स्थानिक अपरिचित भाज्यांनी इथली मंडई फुलून जाते. पावसाळा सुरू होताच कोकणात स्वयंपाकघरांना वेध लागतात ते या काळात मिळणाऱ्या भाज्यांचे. केवळ पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या खाण्यासाठी घरातले अनेकजण आतुरतात. भारंगी, आकूर, अळू, तेरे, पेवळा, फागला, फोडशी, पिडूशी, कील्ल, कुडूक, ढाण्या, कुढ्याच्या शेंगा आणि फुले, खापऱ्या आणि कोकणातील खास अळंबी म्हणजेच नैसर्गिकरीत्या उगवलेले मशरूम्स. या काही भाज्या आहेत ज्या फक्त पावसाळ्यातच उगवतात. अनेकजण या काळात सात्त्विक आहार घेणे पसंत करतात. मासळीची कसर या पावसाळी भाज्या भरून काढत नसल्या तरी पुढे वर्षभर ताटात मासळी असतेच म्हणूनच कदाचित पाहुण्या बनून आलेल्या आणि थोडा काळ सोबत करणाऱ्या पावसाळी हिरव्यागार रानभाज्या ताटात आपली हक्काची जागा तयार करतात. यातली प्रत्येक भाजी आपले वेगळेपण घेऊनच जन्माला आली आहे. त्यामुळे या भाज्यांना एक वेगळेच महत्त्व आहे. या भाज्यांची मूळ चव किंचितही कमी होऊ न देता, उगाचंच मसाल्यांचा मारा न करता, सर्वांत महत्त्वाचे यातील काही भाज्या एक थेंब तेलाचा वापर न करता केल्या जातात आणि तरीही अतिशय चविष्ट लागतात हेच यांचे विशेष.

उन्हाळ्यात परसदारात पिकलेला फणस उतरवून त्यातले गरे खाऊन झाल्यावर घरातील चाणाक्ष महिला उरलेल्या आठळ्या एकत्रित साठवून ठेवतात. याच वाळवलेल्या आठळ्या उकडून, बारीक चिरून या पावसाळी भाज्यांमध्ये घालतात. फणसाच्या आठळ्यांमुळे भाजीची लज्जत अजून वाढते. कोकणात घराघरांत अशा रानभाज्यांच्या साहाय्याने, एका वेगळ्या पद्धतीने पावसाळा साजरा केला जातो.

चवदार आकूर / अंकुर :-
चवदार ‘आकूर’ पावसाळ्यात नदी, तलावाच्या कडेला / सह्याद्रीत ‘आकूर’ नावाच्या भाजीचे कोंब उगवू लागतात. हिरव्या-मातकट रंगाचे आकुराचे हे कोंब अर्ध्या हाता एवढेच वाढतात. तेवढेच कोवळे असताना ते बाजारात येतात. या दिवसांत कोकणातल्या स्वयंपाकघरात ही भाजी अवश्य शिजते. चिरल्यानंतर थोडेसे चिकट होणारे आकूर प्रत्यक्षात कुरकुरीत असतात. चिरतानादेखील त्यांचा कुरकुरीतपणा जाणवतो. ओल्या खोबऱ्याबरोबर किंवा सुक्या वाटणात थोडे जिरे, २ लाल मिरच्या आणि थोडासा गरम मसाला त्याबरोबर थोडी चिंच घालून हे सगळे बारीक वाटून घेऊन कांद्याबरोबर शिजणाऱ्या आकुरामध्ये घातले की त्या भाजीला एक छानसा आंबट, थोडासा तिखट स्वाद येतो. मसूर, हरभरा डाळ, वाटाणे यापैकी कोणतेही एक कडधान्य आकुरामध्ये वापरले तरी उत्तम. . या प्रत्येक कडधान्यानुसार आकूर भाजीची चव बदलत जाते. आकूरच काय पण यातल्या अनेक भाज्यांमध्ये छोटी सुकट / सुंगटे किंवा जवळा म्हणजे कोलीम घातल्याशिवाय सारस्वत बायकांना चैन पडत नाही. सुंगटांमुळेदेखील भाजीची चव वाढते.

कोकणातल्या रानभाज्या
पावसाळी रानभाज्या
आरोग्यदायी रानभाज्या
ranbhaji
ranbhaji recipe in marathi
ranbhajya
Aakur Ranbhaji
Kokan Forest Vegetables
Konkan Forest Vegetables
kokan ranbhaji
konkan ranbhaji
_________________________________________________________________________________________________

For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w...

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video

जंगलात आकूर भाजी जमवताना आला मुसळधार पाऊस | कोकणातल्या रानभाज्या | Aakur Ranbhaji | Kokankar Avinash

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

कोकण रेल्वेचा गावचा प्रवास - Jamnagar–Tirunelveli Express via Sangameshwar, Konkan Railway Traveling

कोकण रेल्वेचा गावचा प्रवास - Jamnagar–Tirunelveli Express via Sangameshwar, Konkan Railway Traveling

आईने चुलीवर बनवले चढणीचे मासे - सुक्का आणि फ्राय | Chadniche mase recipe, Kokan | Kokankar Avinash

आईने चुलीवर बनवले चढणीचे मासे - सुक्का आणि फ्राय | Chadniche mase recipe, Kokan | Kokankar Avinash

घनदाट जंगलात फक्त एकच घर | कोयना धरणातील जुनं वाजेगांव | Koyna Dam Backwater

घनदाट जंगलात फक्त एकच घर | कोयना धरणातील जुनं वाजेगांव | Koyna Dam Backwater

मुंबई व आजूबाजूच्या परिसरात आला रानभाज्यांचा बहर | सरळगाव बाजारातील मुरबाड तालुक्यातील भाज्यांची ओळख

मुंबई व आजूबाजूच्या परिसरात आला रानभाज्यांचा बहर | सरळगाव बाजारातील मुरबाड तालुक्यातील भाज्यांची ओळख

राजापूरात पाळीव प्राण्यावर बिबट्याचा हल्ला || चव्हाणवाडीत वैभव चव्हाणच्या घरी बिबट्याचा वावर

राजापूरात पाळीव प्राण्यावर बिबट्याचा हल्ला || चव्हाणवाडीत वैभव चव्हाणच्या घरी बिबट्याचा वावर

आईसोबत केला आगोटचा आठवडा बाजार । Weekly Bazar vlog, Sangameshwar Market Ratnagiri | Kokankar Avinash

आईसोबत केला आगोटचा आठवडा बाजार । Weekly Bazar vlog, Sangameshwar Market Ratnagiri | Kokankar Avinash

कोकण रानमेवा शोधायची पद्धत

कोकण रानमेवा शोधायची पद्धत

गावी आल्यावर ही रानभाजी कधीच खायला विसरू नका 😍 |  ranbhaji  konkan sanskruti

गावी आल्यावर ही रानभाजी कधीच खायला विसरू नका 😍 | ranbhaji konkan sanskruti

आईने केला चुलीवरचा झणझणीत बांगडा फ्राय मसाला 🐟🌶️Konkani Style Mackerel Fry Masala | Village Special

आईने केला चुलीवरचा झणझणीत बांगडा फ्राय मसाला 🐟🌶️Konkani Style Mackerel Fry Masala | Village Special

रानभाजी आपटा। सोनं। शेंगळा।उन्हाळ्यातील आयुर्वेदिक रानभाजी।गावाकडची चव।रानभाज्या व रानमेवा।#ranbhaji

रानभाजी आपटा। सोनं। शेंगळा।उन्हाळ्यातील आयुर्वेदिक रानभाजी।गावाकडची चव।रानभाज्या व रानमेवा।#ranbhaji

देवरुख आठवडा बाजार | रविवारचा बाजार | देवरुख चा सर्वात मोठा बाजार | स्वस्तात मस्त असा बाजार |#कोकण

देवरुख आठवडा बाजार | रविवारचा बाजार | देवरुख चा सर्वात मोठा बाजार | स्वस्तात मस्त असा बाजार |#कोकण

आईसोबत शेतात काढली हळद, काकीच्या हातचा गरमागरम नाश्ता 😋 Village Style Turmeric Farming & Breakfast

आईसोबत शेतात काढली हळद, काकीच्या हातचा गरमागरम नाश्ता 😋 Village Style Turmeric Farming & Breakfast

डोंगराच्या कड्याकपारीत आढळणारी भन्नाट रानभाजी 🌿 Ranbhaji #ranbhaji #minivlog #adivasi #sitapichad

डोंगराच्या कड्याकपारीत आढळणारी भन्नाट रानभाजी 🌿 Ranbhaji #ranbhaji #minivlog #adivasi #sitapichad

आईसोबत संगमेश्वर बुधवार आठवडा बाजार । Weekly Wednesday Bazaar, Sangameshwar Market Ratnagiri | Kokan

आईसोबत संगमेश्वर बुधवार आठवडा बाजार । Weekly Wednesday Bazaar, Sangameshwar Market Ratnagiri | Kokan

गेलो खेकडे पकडायला 😱🦀🙄 आली खूप मज्जा 🙂🫠#कोकण #kokanimanus #ratnagiri

गेलो खेकडे पकडायला 😱🦀🙄 आली खूप मज्जा 🙂🫠#कोकण #kokanimanus #ratnagiri

ukshi - hidden gems in kokan || “माणसाची गोष्ट सांगणारे गाव”उक्षी

ukshi - hidden gems in kokan || “माणसाची गोष्ट सांगणारे गाव”उक्षी

आम्ही गेलो आंब्याच्या कलमांना इटा मारण्यासाठी | Mango Trees Plantation | Kokankar Avinash

आम्ही गेलो आंब्याच्या कलमांना इटा मारण्यासाठी | Mango Trees Plantation | Kokankar Avinash

पहली बार देखा असली भोटिया डॉग || bhotia dog uttrakhand

पहली बार देखा असली भोटिया डॉग || bhotia dog uttrakhand

प्रचितगड : सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांचा पहारेकरी | Prachitgad Trek, Shringarpur

प्रचितगड : सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांचा पहारेकरी | Prachitgad Trek, Shringarpur

ЗАЗЕРКАЛЬЕ БАЙКАЛА: КАДРЫ КУСТО, КОТОРЫЕ СПРЯТАЛИ В АРХИВ

ЗАЗЕРКАЛЬЕ БАЙКАЛА: КАДРЫ КУСТО, КОТОРЫЕ СПРЯТАЛИ В АРХИВ

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com