घटस्फोट- एक निष्पाप जीव (
Автор: kayda vision /Adv.Madhav sir(Viregaonkar)
Загружено: 2025-03-16
Просмотров: 229
लहानगी आर्या आई बाबांचे भांडण बघून घाबरून लपणारी.. घटस्फोट म्हणजे काय असत... हे ही माहीत नसलेली आर्या, आज आई बाबांना वेगळं झालेलं बघून, भीतीने हादरून गेलेली... कोण बरोबर कोण चूक... याची तिला अजून जाण नव्हती... तिला इतकंच कळत होतं.... आई बाबा का भांडतात... आणि याच भांडणातून ते वेगळे झाले....
आपण मोठं झाल्यावर अस कधीच भांडायच नाही.... ही गाठ मनाशी तिने बांधून ठेवलेली... आईकडे वाढलेली आर्या लहान वयातच मोठी झालेली..... आईला घर कामात मदत करू लागली होती... खूप समंजस पणा होता तिच्या अंगी..... बघता बघता मोठी होऊन, तिचे ही आता लग्न झाले....नवरा खूप छान मिळाला तिला... समजून घेणारा... पण आर्या त्याच्या ही पेक्षा समंजस पणा दाखवायची, हे त्याला बिलकुल आवडत नव्हतं.... तिने हट्ट प्रत्येक गोष्टीत करावा, अस त्याला वाटू लागला... रविवारी तो मुद्दाम लोळत बसायचा... तिने बाहेर जाऊया असा हट्ट करण्यासाठी... पण ती त्याला कसलाच विरोध करत नव्हती.... आपण काही बोललो, तर नवरा आपला भांडेल, हें तीच्या पक्क मनात बसलं होत... म्हणून ती त्याला कधीच काही बोलायची नाही...
दिसायला अतिशय सुंदर आलेली आर्या... त्याच्या आता डोळ्यावर येऊ लागली.... तो तिचा आता राग राग करू लागला... बघता बघता दोन वर्षे झाली... सहा महिन्याचे लहान मूल तिच्या मांडीवर होत... तो कामावरून आल्या आल्या कागद पत्र तिच्या मांडीवर फेकत म्हणाला... " मला तुझ्या पासून घटस्फोट हवा आहे.." त्याचे वाक्य ऐकूण तिच्या काळजाचे पाणी पाणी झालं... आभाळ कोसळ होत तिच्यावर... लहान पणा पासून जी भीती मनावर रुजली होती... तीच भीती तिच्या बाबतीत डोकं वर काढत होती... त्याला कडीचा ही त्रास न देता ती सगळं सहन करत होती.... आता ही ती त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेने त्याला पाहत होती... नजरेत तिच्या फक्त प्रश्न होते... पण ते ही शब्द बाहेर येण्या ऐवजी तिच्या घशात अडकले... त्याला त्रास नको म्हणून....कोटांची पायरी चढूनी हाय जीव घेऊन खाली मान घालून बसली होती...
वकिलांच्या इकडून तिकडून बोलणी सुरू झाल्या... ती मात्र सुज्ञ होऊन सगळं सहन करत होती... अजूनही....
कोंडलेला श्वास आता गुदमरून बाहेर पडू पाहत होता... वेदनांचा कल्लोळ उर फुटू पाहत होता... अश्रूनाचे हाल बघण्या तिला ही कुठे वेळ होता... त्यांना कुरवळायची मुभा आता संपली होती......
जज साहेबांनी तिला आवाज दिला, तशी ती भानावर आली.... आणि पापण्या वर करून त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागली...
तुम्हाला हा घटस्फोट मंजूर आहे का..?? किंवा त्याबदल्यात तुम्हाला काही बोलायचे आहे का.?? "
तिचा चेहरा काहीसा कठोर होत गेला... निर्विकार चेहऱ्याने ती समोर आली, आणि बोलू लागली...
जज साहेब माझी काय चुकी आहे हे मला अजूनही कळलं
नाही... माझा नवरा कोणत्या बेस वर मला घटस्फोट देत आहे.. याच कारण त्याने मला द्यावे..." त्याच्यावर रोखलेली नजर, खूप सारे प्रश्न होते त्यात...
जज साहेबांनी त्याला याचा जाब विचारला असता तो बोलू लागला.... " लग्न झाल्या पासून मी बघतो, माझी बायको कोणताच हट्ट करत नाही... माझ्याकडे साधी साडी साठी ही मागणी करत नाही... मी नशा करून आलो तरी ही मला कोणताच जाब विचारत नाही... मी जेवणाचं ताट खराब भाजी म्हणून ढकलून दिल, तर ती नवीन भाजी करून देते... का ... का इतका चांगुल पणा करावा हिने तरी.... का मला रागावत नाही... का माझ्याशी भांडत नाही.... याचा अर्थ काय होतो कळत का तिला.... याचा अर्थ तिला माझ्यांकडून काही ही म्हणजे काहीही नकोय... तीच बाहेर कुठे तरी नक्कीचं अफेअर असणार... कशावरून हे मुलंही माझं आहे.?? का मी त्याचा आणि तिचा स्वीकार करू.... का माझं आयुष्य अस कुढत बसून काढू... मला हे अजिबात मान्य नाही जज साहेब...."
आर्यांचे आई वडील तर तिला पाहून स्वतःच्या चुकीची जाणीव झाली.... पण आता त्याला काही पर्याय नव्हता... म्हणून एकमेकांना बघून स्वतःच्या वागणुकीच गिल्ट वाटून शांत खाली मान घालून बसले...मिस्टर भोसले... तुम्हाला काय म्हणायचं आहे यावर...." जज साहेब म्हणाले...
" जज साहेब... एखाद्याच्या अंगी इतकाही चांगुलपणा नसावा... इतकं ही निरागस नसावं.... मी कोणी देव माणूस नाही... समजुन घ्यायला... आणि सगळं काही स्वीकारायला... तीच ऐकून मला खूप वाईट वाटतंय.... तिची बाजू तिने या आधी का नाही मांडली...?? का तिने मला हे सगळं नाही सांगितले..?? मी पण तिला समजून घेतलं असत... " तिच्या डोळ्यात बघत तिचा नवरा म्हणाला...
ती त्याच्या नजरेत बघून अश्रू ढाळत उभी होती...
कोर्ट तिथेच खारीज झाले होते.... एक निष्पाप जीव कोलंडण्यावाचून राहिला होता... आर्या आपल्या नवऱ्याच्य डोळ्यात प्रेम बघत सुखावून गेली होती… धन्यवाद
#घटस्फोट एक निष्पाप जीव #divorce #love #familylaw #divorcesupport #marriage#divorced#relationships#coparenting#separation#divorcerecovery#breakup#divorcecoach#divorceadvice#narcissist#divorcedmom#narcissisticabuse#divorcelawyer#lawyer#emotionalabuse#mediation#domesticviolence#divorcehelp#selflove #lifeafterdivorce#family#divorcequotes #divorcedlife #healing #toxicrelationships #childsupport
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: