ratnagiri forts
Автор: Ajay Patil vlogs
Загружено: 2025-12-25
Просмотров: 210
खारेपाटण
ऊंची : 80 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
मुंबई - गोवा महामार्गावरील खारेपाटण गाव हे ८ व्या शतकात शिलाहार राजाची राजधानी होती. त्याकाळी खारेपाटण गाव ‘बलिपत्तन’ या नावाने ओळखले जात असे. खारेपाटण गाव वाघोटन खाडी किनार्यावर वसलेले आहे. प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. ८ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत जवळजवळ १००० वर्षाच्या इतिहासाचा साक्षिदार असलेला हा किल्ला आहे.
खारेपाटण किल्लाचा इतिहास
इ.सनाच्या ८व्या शतकात शिलाहार राजांचे दक्षिण कोकणात(तळकोकणात) राज्य होते शिलाहार राजा श्वम्मियराने(इ.स ७८५ ते ८२०) येथे किल्ला उभारुन राजधानी बसविली. इ.स १६६० मध्ये छ. शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले.
छ. शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला. त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला. इ.स १८५० मध्ये मराठे व इंग्रज यांच्यात घनघोर युध्द झाले. यात हा किल्ला उध्वस्त झाला व इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पहाण्याची ठिकाणे :खारेपाटण गावातील छोट्याशा टेकडीवर वसलेल्या या किल्ल्याला पूर्वीच्या काळी एका बाजूने खाडीचे व जमिनीच्या बाजूने खंदकाचे संरक्षण होते. आज गावाची वाढ झाल्यामुळे खंदक नष्ट झाले आहेत. खारेपाटण गावातून किल्ल्यावर असलेल्या शाळेकडे जाण्यासाठी पायर्यांची वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मातीत गाढले गेलेले बुरुज व तटबंदी दिसते. बालेकिल्ल्यावर दुर्गादेवीचे मंदिर आहे, ते शिवाजी महाराजांनी बांधले होते. या मंदिराजवळील विहिरीतून एक भूयार आहे व त्याचे दुसरे टोक खाडीवरील ‘‘घोडेपथार’’ या जागी झुडुपात लपलेले पाहायला मिळते.. याशिवाय किल्ल्यावर ‘सुळाचा दगड’ ,उध्वस्त वास्तूंचे चौथरे इ. गोष्टी पाहायला मिळतात.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: