Скачать
विठ्ठल आमुचे जीवन (नाटाचा अभंग) - संत तुकाराम
Автор: VISHWA SURYA
Загружено: 2020-04-10
Просмотров: 169076
Описание:
विठ्ठल आमुचे जीवन (नाटाचा अभंग) - संत तुकाराम
विठ्ठल आमुचे जीवन । आगम निगमाचे स्थान ।
विठ्ठल सिद्धीचे साधन । विठ्ठल ध्यान विसावा ॥1॥
विठ्ठल कुळीचे दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त ।
विठ्ठल पुण्य आणि पुरूषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥2॥
विठ्ठल विस्तारला जनी । सप्तही पाताळे भरूनी ।
विठ्ठल व्यापक त्रिभुवनी । विठ्ठल मुनि मानसीँ ॥3॥
विठ्ठल जीवीचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोवळा ।
विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेला चाळा विश्व विठ्ठले ॥4॥
विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता ।
विठ्ठलेविण चाड नाही गोता । तुका म्हणे आता नाही दुसरे ॥5॥
स्वर - #विश्वनाथ_महाराज_वारिंगे
कोरस - #विवेक_वारिंगे
संकल्पना - #विवेक_वारिंगे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: