Ranjangiri Fort
Автор: Premal Bhoir
Загружено: 2025-12-10
Просмотров: 20
रांजणगिरी किल्ला संक्षिप्त माहिती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत वसलेला रांजणगिरी हा किल्ला आपल्या समृद्ध इतिहास आणि रंजक नावासाठी ओळखला जातो. प्राचीन काळापासून नाशिक शहर हे एक प्रमुख व्यापारी केंद्र होते. डहाणू बंदरातून येणारा माल जव्हार, गोंडाघाट आणि अंबोली घाट यांसारख्या मार्गांनी नाशिकला पोहोचत असे. या महत्वाच्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले, ज्यात जव्हार जवळील भूपतगड आणि घाटमाथ्यावरील त्र्यंबकगड, बसगड (भास्करगड), हर्षगड, अंजनेरी आणि रांजणगिरी यांचा समावेश आहे.
रांजणगिरी किल्ल्याचे नाव त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे पडले असावे. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला असलेला सुळका रांजणाच्या आकारासारखा दिसतो, ज्यामुळे किल्ल्याला “रांजणगिरी” हे नाव मिळालं.
#travel #fort #fortsofindia #maharashtraig #maharashtratrekking #marathi #monsoontrekking #mountains #travel #travelblogger #monsoon
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: