Healthy Khuskhushit Kachori | कमी तुपात खुसखुशीत कचोरी | Perfect Tea-Time Snack😋
Автор: Aagri Malvani Fusion
Загружено: 2025-11-18
Просмотров: 34
हेल्दी खुसखुशीत कचोरी | Healthy Khuskhushit Kachori Recipe (Marathi)
साहित्य (Ingredients)
पिठासाठी :
1 कप गव्हाचे पीठ
1/4 कप रवा
1 चमचा ओवा
1 चमचा तीळ
मीठ – चवीनुसार
1 चमचा तूप
पाणी – आवश्यकतेनुसार
सरणासाठी :
2–3 हिरव्या मिरच्या
1 चमचा लसूण-आले पेस्ट
2–3 उकडलेले बटाटे
100 ग्रॅम उकडलेले मटार
1 चमचा तूप
1 चमचा धणे
1 चमचा जिरे
1 चमचा बडीशेप
मीठ – चवीनुसार
गरम मसाला – 1 चमचा
चाट मसाला – 1 चमचा
1 चमचा कसुरी मेथी
कृती (Method)
१) पिठाची कृती :
1. गव्हाचे पीठ चाळून घ्या.
2. त्यात रवा, 1 चमचा तूप, तीळ, ओवा आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
3. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळा.
4. 20 मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्या.
२) सारणाची कृती :
1. धणे, जिरे आणि बडीशेप जाडसर वाटून घ्या.
2. हिरव्या मिरच्या कुटून घ्या.
3. एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करा.
4. त्यात वाटलेले मसाले, कुटलेली मिरची, लसूण-आले पेस्ट घालून छान परतून घ्या.
5. आता त्यात उकडलेले बटाटे, मटार, मीठ, गरम मसाला आणि चाट मसाला घालून चांगले मिक्स करा.
6. सारण तयार.
३) कचोरी बनवणे :
1. तयार पिठाचे समान आकाराचे गोळे करा.
2. प्रत्येक गोळ्याची छोटी पुरी (पारी) लाटा.
3. त्यामध्ये एक चमचा सारण भरा आणि पुन्हा छोटा गोळा करून बंद करा.
4. अप्पे पात्र थोडे तूप घालून सर्व कचोरी शॅलो फ्राय करा.
5. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत शिजवा.
✨ तयार आहे आपल्या कमीत कमी तुपात बनलेली, खुसखुशीत आणि सुपर हेल्दी कचोरी
👍 व्हिडिओ आवडला असेल तर LIKE करा, FRIENDS बरोबर SHARE करा आणि SUBSCRIBE जरूर करा! ❤️
#HealthyKachori
#KhuskhushitKachori
#AppePanRecipe
#HealthySnacks
#MarathiRecipe
#CrispyKachori
#Gahuachori
#TeaTimeSnacks
#HomemadeSnacks
#MarathiKitchen
#EasySnacksRecipe
#CrispySnacks
#IndianScks
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: