दत्त जन्मोत्सव मायनरमध्ये उत्साहात, हजारो भाविकांनी घेतले दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ
Автор: The Daily Life
Загружено: 2025-12-04
Просмотров: 624
#dattajayanti #mahalung #shreepur
दत्तजयंती मायनर मध्ये उत्साहात साजरी,हजारो भाविकांनी घेतले दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ
महाळुंग-श्रीपूर परिसरात दत्त जयंतीला भक्तांची ओढ — महाप्रसादाचे वाटप
संपादक दत्ता नाईकनवरे The Daily Life]
श्रीपूर तालुका माळशिरस : महाळुंग-श्रीपूर परिसरातील मायनर येथील दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती उत्सव 2025 मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा झाला. श्री दत्त तरुण मंडळ मायनर, स्थानिक ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या संयुक्त आयोजनातून हा भव्य सोहळा पार पडला.
सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची सतत गर्दी सुरू होती. श्री दत्त कथा, महाभिषेक, कीर्तन, भजन, पुष्पवृष्टी असे विविध आध्यात्मिक उपक्रम दिवसभर सुरू राहिले. सायंकाळी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. स्थानिक महिला आणि पुरुषांनी महाप्रसाद सर्वांना वाटप केला
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: