रामरक्षा प्रवचन-३२|श्रीराम-परशुराम युद्धाचे दैवी रहस्य- भक्ती, नम्रतेतून आत्मपरिवर्तन|Aniruddha Bapu
Автор: Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
Загружено: 2025-11-15
Просмотров: 7427
भगवंताची दिव्य आयुधे कोणती व ती आमच्या कशी उपयोगाला येतात हे सांगितल्यानंतर सद्गुरु अनिरुद्ध बापू, दि. ७ जुलै २००६ रोजी केलेल्या रामरक्षेवरील प्रवचनात, रामरक्षा-कवचातील ‘भुजौ भग्नेशकार्मुक:’ अर्थात ‘शिवधनुष्याचा भंग करणारा राम माझ्या भुजांचे रक्षण करो’ ही पंक्ती समजावून सांगत आहेत.
रामायणामध्ये एक कथा सांगितली जाते, ती सीतास्वयंवराच्या वेळच्या प्रभु श्रीराम आणि भगवान परशुरामांच्या द्वंद्वाची. ह्या कथेवरून अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहतात की ‘परशुराम आणि श्रीराम जर एकाच महाविष्णुचे सहावे व सातवे अवतार सांगितले जातात, तर दोघे एकाच वेळेला समोरासमोर कसे आले आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात युद्ध कसे होऊ शकते?’ इथे सद्गुरु अनिरुद्ध, ‘भुजौ भग्नेशकार्मुक:’ पंक्तीच्या अनुषंगाने ह्या संघर्षामागील दैवी रहस्य समजावून सांगतात.
भुजा म्हणजे, खांदे व हात (कर) ह्यांना जोडणारा शरीराचा भाग. खांद्यांच्या सहाय्याने ओझे उचलले जाते (लेबरवर्क), तर हाताच्या सहाय्याने आपण लिहिणे आदि कामे (स्किलफुल वर्क) करतो. ह्या दोघांना जोडणारी भुजा, ह्या दोन प्रकारच्या कामांमधील बॅलन्स कसा साधते, हे ह्या राम-परशुरामांच्या युद्धाच्या कथेच्या आधारे सद्गुरु बापू समजावून सांगतात आणि त्याचमुळे, ह्या भुजांचे संरक्षण होणे का आवश्यक आहे व ते शिवधनुष्य भंग करणारा रामच का करू शकतो, हे स्पष्ट करतात.
हे युद्ध कोणाचे, कोणाशी, कोणासाठी चालू आहे व त्याचा आमच्या जीवनाशी कसा संबंध आहे, हे एकदा का नीट समजले, तर आमच्या जीवनातले अनाठायी आंतरिक संघर्ष कसे टळतात, ते सद्गुरु बापू इथे विविध उदाहरणांसहित नीट समजावून सांगतात. जेव्हा आपण ‘त्या’ला ‘मी’च्या पेक्षा अधिक प्राथमिकता देतो, तेव्हा जीवनात कसे चमत्कार घडतात आणि आपले जीवन कसे अंतर्बाह्य सुंदर बनते, हे ते कृष्णचरित्रातील कुब्जेच्या कथेच्या आधारे शेवटी उलगडून दाखवतात.
#aniruddhabapu #ramraksha #parshuram
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
----------------------------------
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: