केळी, पपई, एरंडीचे खांब काढण्यासाठी कटाई मशीन - शेतीसाठी कटाई मशीन विकसीत - शोधकर्ता हंसराज राजकुळे
Автор: Marathi Knowledge by Digvijay Mali
Загружено: 2020-07-14
Просмотров: 63807
#TalodaSamachar #DigvijayMali
शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी - शेतीसाठी कटाई मशीन विकसीत - शोधकर्ता हंसराज राजकुळे मो.+919689715143
केळी, पपई, कापूस आदी पिक उत्पादन करणार्या शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी
पहा कसं काम करत कटाई मशीन !
केळी पपई कापूस आदी पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर या पिकांचे मूळ व खोड शेतातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी बांधवांना यापूर्वी मोठी कसरत करावी लागत होती मात्र नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात राहणार्या हंसराज राजकुळे या तरुणाने यावर चांगलाच उपाय शोधला आहे.
तळोदा शहरातील हंसराज राजकुळे यांनी आपल्या बुद्धीकौशल्य व दीर्घ अनुभवाच्या जोरावर विविध पिकांसाठी ट्रॅक्टरचलित कटाई मशीन विकसीत केल्यामुळे शेतकरी बांधवांचा पैसा व वेळ दोघांची बचत झाली आहे.
विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेल्या कटाई मशीनमुळे पिकांचा खांब्याचे बारीक बारीक तुकडे होऊन जमीनीची सुपिकता वाढणार आहे यामुळे मशीन पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे
हंसराज राजकुळे यांनी आपल्या उद्यमशीलतेबाबत बोलताना सांगितले की, शेती विकासासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा या हेतूने अवजारांची मोडतोड करून पुन्हा नवनवीन प्रयोग करत असतो. आत्तापर्यंत त्यांनी हजारो शेतकऱ्यांना विविध अवजारांची सेवा दिली आहे.
कामे वेळेत पार पाडण्यासाठी त्यांच्यासोबत भूषण सुर्यवंशी, रमेश मगरे, सुरेश पाडवी लक्ष्मण ड्रायव्हर आदी सहकारीही कार्यशील असतात.
केळी कटाई मशीन
पपई कटाई मशीन
कापूस कटाई मशीन
एरंडी कटाई मशीन
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: