स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे 7 नियम लक्षात ठेवा.. || Motivational thoughts in Marathi
Автор: Real Marathi
Загружено: 2023-04-27
Просмотров: 1498811
स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे 7 नियम लक्षात ठेवा.. || Motivational thoughts in Marathi
स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे 7 नियम लक्षात ठेवा
लोक तुम्हाला किंमत देत नाहीत का? तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल, लोकांनी तुम्हाला मान द्यावा, असं वाटतं असेल तर हे 7 नियम ऐका आणि लक्षात ठेवा.
तुम्ही काय करत आहात किंवा काय करणार आहात, हे नेहमी लोकांपासून लपवून ठेवा. कारण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाहीत, तर लोक तुम्हाला हसतील.. आणि, हा फक्त बोलका पोपट आहे, असे म्हणतील.
लोकांना तुम्ही काय करणार आहात, हे सांगण्याची बिलकुल गरज नाही.. त्यांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या..
लोकांशी बोलताना मोजून मापून बोला. बुद्धिमान लोक कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत, वायफळ बडबड करीत नाहीत, व्यर्थ बोलण्यात वेळ वाया घालवत नाहीत.
म्हणून, नेहमी बोलताना संयम ठेवा. गरजेपेक्षा कमी बोला.. गरजेपेक्षा जास्त केलेली बडबड सरतेशेवटी आपल्याला मूर्खच ठरवते; कारण अति बोलण्याच्या ओघात आपण एखादे का होईना हास्यास्पद विधान करतोच.
याउलट जर तुम्ही शांतपणे, विचार करून, कमीत कमी शब्दांत बोललात तर लोकांवर एक वेगळी छाप पडते. तुमच्या कमी बोलण्याने समोरच गोंधळून जातो आणि काही न काही बोलून जातो. त्याची कमजोर बाजू आपल्या लक्षात येते.
स्वतःची image म्हणजेच प्रतिष्ठा जपा. या image वरच अनेक गोष्टी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात. लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी जी ऊर्जा जरूरी असते, ती या प्रतिष्ठेतूनच येत असते.
स्वतःची image अशी बनवा, की तुमची चेष्टा-मस्करी करताना एखाद्याला 100 वेळा विचार करावा लागेल.
Image कशी तयार होते? तुमचे राहणीमान, तुमची श्रीमंती, तुमचे बोलणे आणि तुमचे काम या 4 गोष्टीच तुमची image तयार करतात.
म्हणूनच, राहणीमान सुधारा, मेहनत करून पैसा कमवा, बोलताना शब्द मोजकेच मात्र प्रभावी वापरा, आणि काम प्रामाणिकपणे करा.
आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुळीला मिळते. म्हणून कोणतेही असे काम कधीच करू नका, ज्याने तुमची image खराब होईल.
लोक तुम्हाला जसे पाहतात, तशीच तुमची प्रतिमा बनत जाते. यासाठी राजा सारखं जगा, राजा सारखं काम करा आणि लोकांसमोर स्वतःला राजासारखचं दाखवा.
स्वतःला कमी समजू नका. इतरांसमोर स्वतःतील दोष प्रकट करू नका. संधि मिळेल तेंव्हा लोकांना तुमच्यातील प्रतिभा आणि गुण दाखवून द्या.
स्वतःवर अगाध विश्वास ठेवा. स्वतःला कमी लेखू नका. जो स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याच्यावर सगळी दुनिया विश्वास ठेवते.
जर तुम्हाला लोकांकडून मान हवा असेल, तर लोकांपासून दूर राहायला शिका. अंतर ठेऊन वागायला शिका. तुम्ही जितके सहज लोकांना available असाल, तितकीच लोक तुम्हाला कमी किंमत देतील.
व्हीडीओ आवडला असेल तर कृपया LIKE SHARE SUBSCRIBE करा.
धन्यवाद!
ॐ नमो नारायणा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: