स्टेज फीअर (Stage Fear) सह सर्व भित्यांवर मात करते ती तुमची भक्ती - भक्त माधवदास कथा |Aniruddha Bapu
Автор: Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
Загружено: 2025-12-25
Просмотров: 26474
आपण जीवनात अनेकदा ‘स्टेज-फीअर’ हा शब्द ऐकतो. आपल्याला बहुधा ह्या शब्दाचा अर्थ - ‘स्टेजवर उभे राहून लोकांसमोर परर्फॉर्म करण्याची भीती’ असा वाटतो. म्हणजे तो एक अर्थ आहेच; पण ह्याचा ‘फीअर ऑफ ऑडियन्स’ एवढाच संकुचित अर्थ नाही, हे सांगून सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी गुरुवार दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात ‘स्टेज-फीअर’चा नेमका आणि व्यापक अर्थ विविध उदाहरणांसहित उलगडून सांगितला.
आम्ही नेहमी, ‘लोक काय म्हणतील’ ह्या विचाराने ग्रस्त असतो आणि त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यात काही अर्थ नाही, हे सांगून सद्गुरु बापूंनी - ‘लोकांना मी आवडतो की नाही ह्याच्यापेक्षा, देवाला मी आवडतो की नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे’ असे ठामपणे सांगितले व भक्ताने त्यासाठी काय करणे आवश्यक आहे हेदेखील स्पष्ट केले.
भक्ताच्या जीवनामध्ये जे बदल घडवून आणायचे असतात ते भगवंत घडवून आणतोच आणतो कारण तोच सर्वांचा एकमेव पालनकर्ता, उद्धारक आहे, असे ठामपणे आश्वासित करताना सद्गुरु बापूंनी औदुंबराच्या वृक्षाच्या फळांचे उदाहरण दिले; तसेच हे सत्य अधोरेखित करणारी ‘माधवदास’ नावाच्या भक्ताची सुंदर कथा सांगितली. ह्या कथेच्या ओघाओघात बापूंनी - ‘गोविंदा....गोविंदा’, ‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा’, ‘जय जय रामकृष्णहरि’ व ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’, हे गजर करून घेतले, ज्याला श्रद्धावानांनी समरसून साथ दिली.
#AniruddhaBapu #stagefear #anxietyrelief
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
----------------------------------
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: