संपूर्ण महाभारत कथा - भाग १ || Sampurn Mahabharat Katha - Part 1 || संपूर्ण मराठी कथा | मराठी भक्ती
Автор: Marathi Bhakti
Загружено: 2021-07-04
Просмотров: 32209
🕉️🕉️ Mahabharat in Marathi || संपूर्ण महाभारत || Marathi Stories 🕉️🕉️
महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे . महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपती कडून लिहून घेतला अशी मान्यता आहे .
या ग्रंथाचे आधीचे नाव जय असे होते.
महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक तात्विक तसेच पौराणिक महाकाव्यात पैकी एक आहे . जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवर चा ठसा अमिट असा आहे .
महाभारतात एक लाखाहून ही अधिक श्लोक असून हा ग्रंथ ग्रीक कावे इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्या ही सात पट मोठा आहे . महाभारत हा मूळच्या जय नामक ग्रंथाचा विस्तार आहे  . या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही . काही इतिहासकारांनी नुसार ग्रंथातील घटना इसवी सन पूर्व २५०० च्या सुमारास घडल्या . महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहण आधी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या तर महाभारताचा काळ सुमारे इसवी सन पूर्व २०००  इतका मागे जाऊ शकतो. तसेच भारतीय कालगणनेचा स्रोत म्हणजे पंचांग यातील युधिष्टिर शक म्हणजेच प्रथम पांडव याचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरू केलेली कालगणना तेव्हापासूनच्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे ५००० वर्षे होऊन गेली असावीत . महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो . त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इसवी सन पूर्व २२०० ते इसवी सन पूर्व २००० धरण्यास हरकत नाही . दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेत सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या आधुनिक संशोधनानुसार महाभारतातील युद्ध १३ ऑक्टोबर इसवीसन पूर्व ३१३९ रोजी सुरू झाले .
महाभारत या श्रेष्ठ महाकाव्याचा विषय गुरु प्रदेशातील संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे .
ऐतिहासिक राजांपर्यंत पोहोचणारी परंपरागत घराण्यांची नावांची संख्या मोजण्यास असे दिसते की जर अशी लढाई खरोखरच झाली असेल तर ती फक्त इसवी सन पूर्व ८५० च्या सुमारास झाली असणे शक्य आहे .
🙏🙏🙏Please Like , Share ,  Comment And Subscribe Our channel🙏🙏🙏                
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: