पुणेरी राजवाडा घरामध्ये केला|गणपती बाप्पासाठी |पुठ्य्यापासून राजवाडा तयार केला | ganpati decoration
Автор: sunil mali vlog
Загружено: 2023-09-15
Просмотров: 13842
पुणेरी राजवाडा घरामध्ये केला|गणपती बाप्पासाठी |पुठ्य्यापासून राजवाडा तयार केला | ganpati decoration
मंडळी ,
अचानक प्लॅन झाला आणि मुंबई ला म्हणजे भिवंडीला शूट ला गेलो , शूट झालं आणि नंतर आपल्या मित्राच्या घरी जायचं ठरवलं, घरी गेलो पण मित्र नव्हता त्याची बायको होती म्हणजे वहिनी घरी होती , वहिनी ने लगेच आपल्या मित्राला म्हणजे राज म्हात्रे ला फोन लावला तो लगेच आला मला भेटायला ,पहिल्या मजल्यावर भाऊच घर , बराच वेळ गप्पा मारत होतो ,वेळ झाला म्हणून घरी निघत होतो निघता-निघता ग्राउंड फ्लॉवर आलो , आणि एका घरातून आवाज आला माळी मागे वळून बघितलं तर राज म्हात्रे भाऊंचे भाऊ कमलेश भाऊ ह्यांनी हाक मारलेली .
हळूच घरात डोकावून बघतले कि काय घरात गणपती बाप्पाचे ganpati bappa आगमनासाठी भली मोठी तयारी चालू होती ,ती तयारी बघून राहवलं नाही ..लगेच कॅमेरा काढला आणि शूटिंगला सुरुवात केली आणि कमलेश म्हात्रे भाऊंना सांगितले कि तुम्ही डेकोरेशन decoration केले आहे त्याची माहिती द्या .
कमलेश म्हात्रे भाऊंनी होकार दिला आणि शूटिंग ला सुरुवात केली .गणपती बाप्पाच्या आगमनासाठी चक्क घरात भलामोठा पुणेरी राजवाडा puneri rajwada तयार केला ते बघून खरंच भारी वाटलं ..पुणेरी राजवाडा चक्क पुठ्य्यापासून राजवाडा तयार केला .
कमलेश भाऊ चक्क २ महिन्यापासून राजवाडा तयार करत होते आणि त्यांच्या जोडीला त्यांचा मित्र नाजीम शेख भाऊ .खरंच ह्या भाऊंच्या मैत्रीला मानाचा मुजरा केला .
खूप सुंदर पुणेरी राजवाडा दोघं मित्रांनी आणि सह परिवार ह्यांनी केला , त्याच बरोबर कमलेश भाऊंची आईने सुती कापडाचे तोरण तयार केले ते बघून खूप मस्त वाटले .
आपली संस्कृती आपण सर्वांनी जपून ठेवले पाहिजे आणि पुढच्या पिढीला शिकवलं पाहिजे .
गणपती बाप्पा मोरया | मंगल मूर्ती मोरया
ganpati bappa morya | mangal murti morya
#पुणेरी
#राजवाडा
#घरामध्येकेला
#गणपतीबाप्पासाठी
#पुठ्य्यापासूनराजवाडातयारकेला
#ganpati
#ganpatidecoration
#decoration
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
[email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: