पंढरपूर कार्तिकी वारी निमित्त भरलेला बैल बाजार 2025 | Pandharpur Bail Bazar 2025 ..
Автор: Ashish Humbare
Загружено: 2025-11-04
Просмотров: 2448
कार्तिकी वारीनिमित्त अनेक वर्षांच्या परंपरेनुसार शेतकऱ्यांचा सखा असणाऱ्या पशुधनाचा मोठा बाजार पंढरपुरात भरतो.याठिकाणी आवर्जून भेट दिली.
यावेळी खिलार बैल , पंढरपुरी म्हशी अशा वेगवेगळ्या प्रजातींच्या जनावरांची आलेल्या पशुपालकांकडून माहिती घेतली. शेतकऱ्यांशी, पशुपालकांशी संवाद साधला. पंढरपूरच्या 'कार्तिकी यात्रेतील' या बाजाराला मोठा इतिहास आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कर्नाटक राज्यातून हजारोंच्या संख्येने जनावरे पंढरपुरच्या बाजारात आले आहेत. आपले नेते प्रशांत काकांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्व सुविधा या बाजारात पुरवल्या गेल्या आहेत.
बळीराजाचा मित्र असणारा पशुधन्न बघायला त्यांच्या सोबत वेळ घालवायला आनंद काही औरच. पण अनेक शेतकरी भावाना आपले पशुधन विकताना झालेले दुःखही या बाजारात पाहायला मिळते. तसेच काही जण आपल्या जनावरचे नंबर काढण्यासाठी पण येतात विशेष म्हणजे खिलार जनावरे, पंढरपूरी म्हशी पशुपालकांनी अत्यंत मेहनतीने, कष्टाने संगोपन केलेले असते.
या बाजारात जनावरे खरेदी -विक्री ची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते.
आपल्या 'पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती' मार्फत आकर्षक अशी बक्षिसे, पशुपालकांना पुरस्कार दिला जातो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: