तुळजाभवानी भेंडोळी उत्सव (दिवाळी उत्सव )२०२२ । Tuljabhavani Bhendoli - Tuljabhavani Live Darshan
Автор: Kishor Pawar Vlogs
Загружено: 2022-10-25
Просмотров: 7124
तुळजाभवानी भेंडोळी उत्सव (दिवाळी उत्सव )२०२२ । Tuljabhavani Bhendoli - Tuljabhavani Live Darshan
नमस्कार मित्रानो मी किशोर पवार
आपल्या सगळ्याच Kishor Pawar Vlogs या मराठी Youtube channel वरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे .
आज मी तुळजाभवानी भेंडोळी उत्सव याबद्दल Vlog बनवला आहे. विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि share करा.
संभळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेच्या दरबारात सोमवारी (दि. २४) अश्विन अमावस्येच्या संध्याकाळी धगधगत्या अग्नीचा थरार भेंडोळी उत्सव चांगलाच रंगला. आई राजा उदोउदो आणि काळभैरवनाथाचा चांगभलंच्या जयघोषात अग्नीचा पेटता लोळ अंगाखांद्यावर वाहून नेण्याचा थरार सुमारे दीड तास सुरू होता. असा अग्नीचा थरार पाहण्यासाठी भेंडोळी मार्गावर दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
तुळजाभवानी मंदिराच्या दक्षिणेला वसलेल्या काळभैरवनाथ मंदिराच्या कड्यावर सायंकाळी सातच्या सुमारास काळभैरवनाथाचे पूजारी शुभम पुजारी, अजित पूजारी यांनी भेंडोळी प्रज्ज्वलित केली. यावेळी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांच्यासह गणेश पुजारी, वैजिनाथ पूजारी, तानाजी पूजारी, सुनिल पूजारी, प्रकाशनाथ पूजारी, सोमनाथ पूजारी, श्रीनाथ पूजारी आदी काळभैरवनाथाचे पूजारी, मंंदिर संस्थानचे कर्मचारी, भाविक आदींची उपस्थिती होती.
तत्पूर्वी सोमवारी दिवसभर अमावस्येनिमित्त काळभैरवनाथाला तेलाचा अभिषेक घालण्यासाठी शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी कड्यावर मोठी गर्दी केली होती. भेंडोळी मार्गावर आकर्षक रांगोळी काढली होती. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या भाविकांनी भेंडोळीवर तेल, तुप, पाणी वाहिले. भेंडोळीसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता.
शांत करण्याचा मान क्षीरसागर कुटुंबीयांच
काळभैरवनाथाच्या कड्यावरून भेंडोळी प्रज्वलित केल्यावर पानेरी मठाजवळील अरूंद बोळातून भेंडोळी शिवाजी दरवाजामार्गे भवानी शंकर मंदिरासमोरुन तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात जाऊन देवीदर्शन घेते. त्यानंतर भेंडोळी मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण करून निंबाळकर दरवाजा, महाद्वार, आर्य चौक मार्गे कमान वेस येथील डुल्या मारूती मंदिरात पोहचल्यावर किरण क्षीरसागर व बुबा क्षीरसागर या बंधूंनी भेंडोळी शांत केली.
देशात केवळ तुळजापूर, काशी नगरीत भेंडोळी
तुळजाभवानी देवीच्या सर्वच सण- उत्सवात भेंडोळीचा थरार वेगळा आहे. संपूर्ण देशात केवळ काशी व तुळजापूर या दोन ठिकाणी भेंडोळी काढण्यात येते. दहा फूट लांबीच्या लाकडी दांडीला कापडी पलिते बांधून त्यावर तेल, तूप, पाणी ओतून त्याला प्रज्वलित करून आगीचा लोळ २० ते २५ तरूण खांद्यावरून वाहून नेतात. हा थरार सुमारे दीड ते दोन तास चालतो. हे पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येतात.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: