“सुरुची समुद्र किनारा स्वच्छता मोहीम २०२५”
Автор: Official Vasai Virar City Corporation
Загружено: 2025-09-21
Просмотров: 121
“सुरुची समुद्र किनारा स्वच्छता मोहीम”
शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी “आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त” वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील ‘सुरुची समुद्र किनारा, वसई (पश्चिम)’ येथे वसई विरार शहर महानगरपालिका व ‘मे. मेकिंग द डिफ्रेन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेच्या सहकार्याने “किनारपट्टी स्वच्छता मोहीम” (Beach Clean-up Drive) यशस्वीरीत्या राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल 5000 पेक्षा जास्त जणांनी आपला सहभाग नोंदवला.
या स्वच्छता मोहिमेत मा.आयुक्त महोदय श्री. मनोजकुमार सुर्यवंशी(भा.प्र.से.), मा. अतिरिक्त आयुक्त महोदय श्री. संजय हेरवाडे, मा. श्री. तरुण वर्मा - विभागीय अधिकारी, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय, मा. उप आयुक्त श्रीमती अर्चना दिवे, मा. उप आयुक्त श्रीमती स्वाती देशपांडे, मा. उप आयुक्त श्री. प्रशांत जाधव, मा. प्र. शहर अभियंता श्री. प्रदीप पाचंगे, महानगरपालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी विशेषतः स्वच्छ्ता कर्मचारी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, 20 शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पर्यावरणाशी निगडित संस्था, पर्यावरणप्रेमी नागरीक, 10 महिला बचत गट, 10 NGO सामाजिक संस्था, स्वयंसेवक, पत्रकार, नागरीक, पर्यटक इ. सहभागी झाले होते.
जवळजवळ 2 कि. मी. च्या भागात ही स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 35 टन कचरा गोळा करण्यात आला. या कचऱ्याचे विलगीकरण करून हा कचरा महानगरपालिकेच्या क्षेपणभूमी येथे वाहतूक करण्यात आला.
#SwachhBharatGov #MissionLiFE #ChooseLiFE #MajhiVasundharaAbhiyan6.0 #SwachhBharatMissionUrban #SwachhSurvekshan2025Maharashtra #SwachhSurvekshan2025 #Platicban #swachhtahiseva2025 #shs2025
#swachhostav #SwachhBharat #SwachhBharatGov #mojsddws #MoHUA_India
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: