तीळ लागवड तंत्रज्ञान/sesame sowing technique
Автор: Krishi Vigyan Kendra, Sangvi
Загружено: 2023-02-07
Просмотров: 17716
उन्हाळी तिळाची पेरणी ही जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. उशिरा पेरणी करणे टाळावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम प्रति किलो, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पूर्व विदर्भात उन्हाळी हंगामात भाताचे (धान) पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सलग उन्हाळीनंतर खरिपात भात पीक घेतल्यामुळे पूर्व विदर्भात खरिपात भात पिकावर किडींचा प्रादूर्भाव वाढतो. व्यवस्थापन खर्च वाढतो. त्याच प्रमाणे उन्हाळी भात अधिक पाणी लागते. उन्हाळी भाताला पर्याय म्हणून उन्हाळी तीळ घेणे फायदेशीर ठरते. भंडारा जिल्ह्यामध्ये उन्हाळी तीळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तीळ हे कमी दिवसांत येणारे पीक असून, सलग, आंतरपीक व मिश्रपीक म्हणूनही घेता येते. हवामान तीळ पीक हे सर्व हंगामात घेता येते. या पिकास २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान पोषक असून, येणाऱ्या पावसाचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जमीन तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. पाणी साचून ठेवणाऱ्या जमिनी या पिकास मानवत नाहीत. पूर्वमशागत व भरखते जमीन चांगली तयार करावी. उभी-आडवी नांगरून चांगली भुसभुशीत करावी. काडी-कचरा वेचून शेत स्वच्छ करावे. उभळ (पटाल) फिरवून पेरणी करावी. पेरणीपूर्वी १० ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत मिसळावे. तीळ बियाणे बारीक असल्यामुळे पेरणी करताना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यासाठी पूर्व विदर्भातील जमिनीमध्ये भात पिकानंतर अन्य पिके घेताना जमिनीत निघालेली ढेकळे बारीक करून घ्यावीत. अन्यथा, तीळ बियाणे वर मातीचे ढेकूळ विरघळून दाबले जाते. उगवण होत नाही. तिळाचे सुधारित वाण व त्याचे गुणधर्म
@krishi vigyan Kendra sangvi Rly
#kvk
#krishi
#sesame
#kvk, sangvi Rly
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: