दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा | Digambara Digambara | Datta Bhajan Marathi | दत्त Mantras 🙏
Автор: Ishwar Bhakti Mahima
Загружено: 2025-12-24
Просмотров: 384
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” हे भगवान श्री दत्तात्रेय स्वामी यांना अर्पण केलेले अत्यंत भक्तिमय मराठी दत्त भजन / दत्त मंत्र आहे.
या पवित्र मंत्राचे श्रद्धेने पठण किंवा श्रवण केल्याने मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि दैवी कृपा लाभते.
श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हे श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. त्यांच्या नामस्मरणाने भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते.
🙏 सकाळची प्रार्थना, ध्यान, पूजा व भजनासाठी उपयुक्त
🎶 भक्तीभावाने भरलेले शांत व मधुर मराठी भजन
🕉️ दैनंदिन नामस्मरण व ध्यानासाठी योग्य
श्रद्धेने ऐका, जपा आणि श्री दत्त गुरूंची कृपा अनुभवा.
Music: Chetan Sunanda Dayaram Sawant
Lyrics: Saanvi
Singer: Neelesh Nirgudkar & Pallavi Kelkar
Chorus: Chetan Sunanda Dayaram Sawant, Neelesh Nirgudkar, Pallavi Kelkar & Rupali R. Varadkar
Programmer: Vishal Patil
Keyboard : Lahu (Bhai) Darekar
Rhythm : Tushar Barve
Voice recording: Muzic Cafe (Shriraj Desai)
Mix & Master: Henry Moniz
Produced : Chetans Entertainment
Lyrics -
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्त दत्त गुरुनाम स्मरुनी
आलो तुजला पहावया
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
**आदि तूच तू अंतही माझा
तूच सखा तू भगवंता
आराधना तुझी नित्य करीन मी
वंदन तुजला अवधूता
साष्टांग नमन घालीत आलो
साष्टांग नमन घालीत आलो
ओढ अशी तुझी गुरुराया
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा**
**दर्शन तुझे हे नयनी साजे
तहान जीवाची जशी ही भागे
तूच वसे या हृदयी नाथा
आले शरण मी तुझिया आता
नको परिक्षा बघु आणखी
नको परिक्षा बघु आणखी
तुझी आरती करावया
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा**
**त्रिशूळ कमंडलू हाती साजे
श्वान कपिला पायी विराजे
तीन मुखांचे रूप हे सुंदर
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
सांग उपाय मी काय करावे
सांग उपाय मी काय करावे
भेट तुझ्याशी घडावया
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा**
**दत्त दत्त गुरुनाम स्मरुनी
आलो तुजला पहावया
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा**
#दिगंबरादिगंबरा #श्रीपादवल्लभ #दत्तभजन #दत्तमंत्र #श्रीदत्त #दत्तात्रेय #मराठी_भजन #दत्तभक्ती #श्रीदत्तगुरु #भक्तीगीत #आध्यात्मिक #नामस्मरण #सकाळचीप्रार्थना #ध्यान #पूजा #हिंदूभजन #मराठीभक्ती #dattaguru
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: