#mdlivemarathi
Автор: M D Live Marathi
Загружено: 2020-04-09
Просмотров: 2016
मस्जिदच्या इमामाना घेऊन कळंब पोलिसांचे आवाहन
कळंब प्रतिनिधी- गुरुवारी रात्री इस्लाम धरणात अतिमहत्व प्राप्त असलेली शबे बारात म्हणजे बडी रात्र आहे. शबे बारातच्या रात्री बांधव मोठ्या प्रमाणात रात्रभर सामूहिक नमाज अदा करीत असतात. या शबे बारातचं इस्लाम धर्मात विशेष महत्व आहे.मात्र देशभरात कोरोनाचा प्रभाव मोठयाप्रमानात वाढल्याने सर्व मस्जिदमध्ये नमाज पठण बंद आहे. त्यामुळे नमाज पठणाला लोक बाहेर येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. कळंब पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या संकल्पनेतून सायंकाळच्या वेळी मुस्लिमबहुल भागात आवाहन करण्यात आलं. मिर्झा मस्जिदचे इमाम मौलाना आरेफ मणियार यांना घेऊन पोलीस व्हॅनच्या स्पीकरमध्ये घरातच नमाज पठण करावे, असं आवाहन करण्यात आले. तसेच मौलाना आरेफ यांनी देशावर कोरोनासारख्या आलेली महामारी दूर व्हावी यासाठी मुस्लिम बांधवानी घरातच दुआ करावी, असं सांगितलं. इस्लामपुरा, मदिना चौक, भोई गल्ली यांसारख्या मुस्लिमबहुल भागात असे आवाहन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्यासह फराहन पठाण, हंगे, कोळेकर, काझी, राऊत आदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: