आंबट चुक्याची भाजी - औषधी फायदे ambat chuka health benefits
Автор: Aple Arogya
Загружено: 2025-01-22
Просмотров: 2452
#आंबट_चुका #ambat_chuka #aplearogya #leafyvegetables #leafyvegitables #ayurveda #ayurvedic #ayurvedictips #ayurved #ayurvedicmedicine #ayurvedicupchar
####################################
आंबट चुका औषधी उपयोग
चुका ही औषधी वनस्पती असून, पाने व बिया औषधात वापरतात. ही वनस्पती खूप आंबट, विरेचक (मलातील गाठी मोडणारे), दीपक, शीतल, शोथघ्न व वेदनास्थापन गुणधर्माची आहे.
• चुका ही वनस्पती हृदयाच्या आजारावर, छातीत दुखणे, बद्धकोष्ठता, प्लीहारोग, उचकी, उदरवायू, दमा, श्वासनलिका दाह, अपचन, वांती व मूळव्याध अशा विकारांवर, रोगांवर उपयुक्त आहे.
• ही वनस्पती मांसपाचक म्हणून शीघ्र काम करणारी व लोह विरघवळणारी आहे.
• ही पित्तजनक आहे. वानशूल, गुल्म, प्लीहा व अदावर्त विकारांत उपयोगी आहे.
• श्वासकास, अरुची व अजीर्ण यात ही इतर औषधांसह वापरतात.
• खरूज, कोड, विंचूदंश व गांधीलमाशी यासारख्या विषारी प्राण्यांच्या चावण्यावर, दंशावर चुका वापरतात.
• शिसारी प्रतिबंध आणि भूकवर्धक हे गुणधर्म या वनस्पतीमध्ये आहेत.
• डोकेदुखीवर चुका व कांद्याचा रस चोळावा.
• चुक्याची पाने शीत, सौम्य विरेचक आणि मूत्रवर्धक आहेत.
• पानांचा रस दातदुखीवर उपयुक्त आहे. ही दाहशामक म्हणूनही वापरतात.
• चुक्याच्या बिया शीत व पौष्टिक आहेत. बिया भाजून आमांशात देतात. चुका पचननलिकेच्या रोगात वापरतात. सुजेवर चुक्याची पाने वाटून त्याचा लेप करतात.
चुका भाजीचे औषधी गुणधर्म
भाजी तयार करण्यासाठी चुक्याची पाने, कोवळ्या फांद्या व खोड वापरतात.
• ही भाजी आंबट-गोड असून, वातदोष कमी करते. पचनास हलकी असून, जेवणास चव आणणारी आहे. भूक लागत नसल्यास किंवा भूक लागूनही जेवण जात नसल्यास चुक्याच्या भाजीमुळे भूक लागते, जेवण जाते आणि पचनक्रियाही सुरळीत होते. ही भाजी थंड असल्याने हातापायांची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह, आदी उष्णतेच्या विकारात भाजीचा उपयोग होतो.
• ज्यांना आतड्यांमध्ये, जठरामध्ये गरम दाह जाणवतो व उलट्या होतात, अशा रुग्णांनी चुक्याची भाजी नियमितपणे खावी.
• आमांश (ॲमॉबियॉसिस) या विकारात अन्न न पचताच पातळ मलाबरोबर बाहेर पडते व शरीराचे पोषण नीट होत नाही, अशा वेळी चुक्याची भाजी खाल्ल्याने अन्नपचन नीट होते व मल बांधून होतो व चांगला गुण पडतो.
• चुका भाजी वांग्याच्या भाजीत मिसळून केल्यास ‘अतिरोचनी’ म्हणजेच अतिशय रुचकर लागते, म्हणून चुक्याचे पर्यायी नाव ‘रोचनी’ असे आहे.
###########################
चुक्याच्या भाजीचे फायदे ambat chuka health benefits,
Aambat Chuka Health Medicine मूळव्याधावर आंबट चुका आहे फायदेशीर,
Health Benefits Of Green Sorrel Leaves | 10 benefits of green vegetables | Food for good eyesight,
गावाकडील पद्धतीची चटकदार आंबट चुक्याची भाजी(खास पद्धत) |ambat chuka bhaji|sorrel leaves curry,
आंबट चुका झुणका,आंबट चुका,आंबट चुका भाजी,आंबट चुका चटणी,आंबट चुका रेसिपी,रानभाजी आंबट चुका,आंबट चुका गरगट्टा भाजी,आंबट चुका कैसे बनाते है,आंबट चुका बनवण्याची पद्धत,गावरान पद्धतीचे आंबट चुका गरगट्टा भाजी,आंबट चूकाची भाजी,आंबट ढेकर येणे उपाय,आंबट ढेकरा येणे उपाय,घशाशी आंबट पाणी उलटी मळमळ होणे उपाय,गावरान पद्धतीचे आंबट चूकाचे गरगट्टा भाजी,आंबट लिंबू चे गोड फायदे,आंबट पदार्थ आणि संधिवात,खट्टा चुक्का सब्जी,आंबट रसाचे फायदे आणि तोटे,सांधेदुखी आणि आंबट पदार्थ,
ambat chuka bhaji,how to make ambat chuka bhaji,ambat chuka bhaji recipe in marathi,ambat chuka bhaji recipe,ambat chuka chi bhaji,ambat chuka mirchi bhaji,ambat chukyachi bhaji,ambat chuka besan,ambat chuka,ambat chuka varan,ambat chuka recipe,ambat chuka chutney,khatta chukka subji,ambat chuka gargatta,ambat chuka dal bhaji,ambat chukka bhaji,ambat chuka dal recipe,ambat chuka daal sabji,how to make ambat chuka,ambat chuka shepu bhaji,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: