सर्वतीर्थ टाकेद जटायु मंदिर sarvthirth taked jatayu temple near nashik नाशिक
Автор: incredible_travel
Загружено: 2024-11-18
Просмотров: 216
|| सर्वतीर्थ टाकेद ||
हे मंदिर नाशिक पासून 45 km अंतरावरती आहे. आणि इगतपुरी पासून 30 km अंतरावर आहे.
प्रभू श्रीराम वनवासात असताना नाशिक जवळील पंचवटी येथे वास्तव्यास होते. पंचवटी येथून रावणाने सीता मातेचे अपहरण केले. सीता मातेला रावण आकाश मार्गे घेऊन जात असताना. जटायू ने रावणावर हल्ला केला त्या दोघांमध्ये युद्ध झाले त्या युद्धामध्ये जटायू ला हार पत्करावी लागली जटायू चा एक पंख रावणाने कापून टाकला.
जटायूची ही अवस्था बघून प्रभू श्रीरामांना फार वाईट वाटले प्रभू श्रीराम म्हणाले मी तुला जीवदान देतो तेव्हा जटायू म्हणाला मला जीवदान नको मला मोक्ष हवा आहे.तुमच्या हाताने मला पाणी पाजा व मोक्ष द्या.
श्रीरामांनी येथीलच एका झाडाच्या बुंध्याशी बाण मारला व सर्व तीर्थांना आमंत्रित केले. प्रभू श्रीरामांनी जटायू ला पाणी पाजले व मोक्ष दिला. वडिलांप्रमाणे जटायू चे अंत्यसंस्कार केले प्रभू श्रीराम टाकेद येथे जटायू चा तेराव्या पर्यंत राहिले व त्यानंतर प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी मानकामेश्वर शिवलिंगाची स्थापना केली.
तसेच येथे एक शिवलिंग असून लिंगाच्या मधील भाग खोलगट असून त्यामध्ये एक शाळीग्राम आहे. मनातील इच्छा बोलून तो शाळीग्राम बाहेर काढून सर्वतीर्थ कुंडात स्नान घालून परत शिवलिंगा मध्ये ठेवल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
या ठिकाणी असलेली मंदिरे
1) जटायू मंदिर
2) दत्त मंदिर
3) राम मंदिर
4) सत्याई माता मंदिर
5) शनी मंदिर
6) दक्षिणमुखी मारुती
7) मानकामेश्वर मंदिर.
गुगल मॅप लोकेशन लिंक
https://maps.app.goo.gl/Wt5niBUNn9n31...
#ai #travel #sarvrirthtaked #सर्वतीर्थ #सर्वतीर्थटाकेद #नाशिक #जटायू #जटायूमंदिर #jatayutemple #viral #viralvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: