चिखली येथे फ्रेंड्स व मैत्री बैलगाडी ग्रुपतर्फे भव्य बैलगाडी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Автор: Tej Marathi news digital
Загружено: 2025-12-08
Просмотров: 1086
#mahendrdalvi #tejmarathinews #alibag #raigad
चिखली येथे फ्रेंड्स व मैत्री बैलगाडी ग्रुपतर्फे भव्य बैलगाडी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण प्रतिनिधि किरण बांधणकर
अलिबाग तालुक्यातील चिखली माती बंदर मैदानावर फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप आणि मैत्री बैलगाडी ग्रुप, हेमनगर व चिखली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी आणि उपसरपंच रसिकाताई केणी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
रायगड तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट मैदान म्हणून ओळखला जाणारा चिखली परिसर या स्पर्धेमुळे गजबजून गेला. स्पर्धेसाठी २० गट करण्यात आले होते. प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी
फॅन, सिलेंडर शेगडी यांसह फायनल फेरीत एक ते चार क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. तसेच प्रेक्षक वर्गासाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये एक बैल जोडी व एक बोकड अशी मोठी बक्षिसे ठेवून सोहळ्याला अधिक रंगत आणण्यात आली.
यावेळी झालेल्या बैलगाडी स्पर्धेच्या फायनल फेरीत ताडवागळे-वडवली येथील युवासेना उपतालुका अधिकारी संकेत पाटील यांच्या बैलगाडीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्र शेठ दळवी, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमित नाईक, उपसरपंच रसिकाताई केणी, बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाटील (बाळ्या दादा), उत्तमशेठ पाटील, कुर्डूस विभाग प्रमुख स्वप्निल पाटील, जीवन पाटील, युवा सेना उपतालुका प्रमुख संकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शर्यती पाहण्यासाठी तालुक्यातील बैलगाडी प्रेमी, बैलगाडी चालक-मालक आणि परीसरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र शेठ दळवी म्हणाले की, बैलगाडी शर्यत हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ असून त्याचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील वाढत्या बैलगाडी स्पर्धांप्रमाणेच चिखलीचे मैदान देखील राज्यातील सर्वोत्तम ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खेळातील जोखीम लक्षात घेऊन आयोजकांनी केलेली व्यवस्था कौतुकास्पद असून आगामी काळात या खेळाला अधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन आमदार दळवी यांनी केले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: