नागपंचमी स्पेशल : बत्तीसशिराळा येथील जिवंत नागपूजेचा इतिहास आणि अतीप्राचीन अंबामाता मंदिराची माहिती
Автор: Sanatan Prabhat
Загружено: 2025-07-28
Просмотров: 59914
इतिहास आणि ग्रामदैवत असलेल्या श्री अंबामातेचे मंदिर !
शिराळ्याचे मूळ नाव ‘श्रीआलय’ होते. श्री म्हणजे लक्ष्मी आणि आलय म्हणजे निवासस्थान. कोल्हापूरची श्री महालक्ष्मीदेवी-अंबाबामाता हिचे मूळ ठिकाण म्हणजे श्रीआलय हाय. कोल्हासुराचा वध केल्यानंतर ती करवीरनिवासिनी झाली. या अंबामातेचे अत्यंत प्राचीन मंदिर येथे असून ती शिराळ्याची ग्रामदैवत आहे. या मंदिरात अंबामातेला तेल वाहण्यासाठी गोरक्षनाथ येत होते, अशी लोकांची श्रद्धा असून आजही त्यांच्या शिष्यामधील एक शिष्य अंबामातेच्या दर्शनासाठी झुंडीच्या वेळेस आवर्जून येतात, अशी आख्यायिका आहे. अनेक संत महंत जसे कि समर्थ रामदास स्वामी, निवृत्तिनाथ, जंगली महाराज येथे येऊन गेल्याचे दाखले आहेत आणि त्यांनी त्यांच्या अभंगातून या लक्ष्मीच्या शिराळ्याची अन् येथील नागपंचमीच्या परंपरेची महती वर्णिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात या परिसरातील ३२ खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात असे. त्यामुळे या गावास ३२ शिराळा असे नाव पडले.
जिवंत नागपूजा करण्याचा इतिहास आणि महाजनांच्या घरी असलेली विशेष परांपरा !
या संदर्भात नागपंचमी उत्सवाचे प्रमुख मानकरी श्री. प्रणव महाजन म्हणाले, ‘‘इ.स. पूर्वी ७ व्या किंवा ८ व्या शतकात गोरक्षनाथ येथे वास्तव्यास होते. गोरक्षनाथ शिराळ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तोरणा-मोरणा जंगलात ते तप:श्चर्येसाठी बसत आणि भिक्षा मागण्यासाठी ते शिराळा येथे येत. एकदा नागपंचमीच्या दिवशी ते महाजनांच्या घरी नागपंचमीच्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी आले होते. त्यांना भिक्षा मागण्यास येण्यास वेळ झाला. भिक्षा देण्यास उशीर का झाले असे गोरक्षनाथांनी विचारले असता, ‘मातीच्या नागाची पूजा करत असल्याने भिक्षा देण्यास उशीर झाला’, असे त्या वेळी महाजनआजींनी सांगितले. त्या वेळी गोरक्षनाथांनी त्यांच्या सिद्धीतून नाग प्रकट केले आणि यापुढे बत्तीसशिराळा येथे जिवंत नागांची पूजा केली जाईल असे सांगितले. येथे नागांना अभय असेल, तसेच लोकांना नागापासून अभय असेल, असेही सांगितले. तेव्हापासून सहस्रो वर्षांपासून ही परंपरा बत्तीसशिराळा येथे चालू आहे. वर्षभर माझे वडील नागदेवतेची पूजा करतात. ही पूजा सोवळ्यात करावी लागतात.
नागपंचमीच्या दिवशी आमच्या घरातून पालखी मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक गुरव, बारा बलुतेदार यांच्या समावेशाने निघते. आदल्या दिवशी गुरव येऊन देवीची मूर्ती स्वच्छ करतात. यानंतर महाजन परिवारातील लोक या मूर्तीला रंगरंगोटी करतात यानंतर पंचमीच्या दिवशी पालखीत मूर्ती ठेवली जाते. पालखीतून ही मूर्ती विविध मंदिरांमध्ये भेटीसाठी नेली जाते. मरीमाई मंदिर, अंबामाता मंदिर, वज्रेश्वरी मंदिर येथे नेण्यात येते. यानंतर दुपारी ४ वाजता ती परत येते. यानंतर उत्तरपूजा झाल्यावर नागपंचमी पूर्ण झाली, असे म्हणतात. यातील मानाच्या नागाच्या पूजेचा मान हा कोतवाल घराण्यास आहे. यात पुरुष नाग मिळणे आवश्यक समजले जाते. यांसह यात सोनार, कुंभार यांसह अन्य नाग असतो.
श्री अंबामाता मंदिर !
येथील श्री अंबामातेचे मंदिर अत्यंत प्राचीन असून या मंदिरात कळमात बसलेली श्री अंबाबामातेची प्राचीन मूर्ती आहे. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती उभी आहे, तर ही मूर्ती कळमात स्थापित आहे. नागपंचमी आणि नवरात्र हे दोन उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या मंदिरात पूजा करणारे पुजारी अधिक माहिती देतांना श्री. आनंदा गुरव म्हणाले, ‘‘या गावाचे चंदनपूर म्हणून प्रसिद्ध होते. या पंचक्रोशीत फार मोठे चंदनाचे वृक्ष असत. या गावाच्या शेजारी गिजवडे या गावात श्री अंबामातेने गिरजासूर असुराचा वध केला. यानंतर अंबाबामाता लक्ष्मी येथे प्रकट झाली. यानंतर त्याचे नाव ‘श्रीआलय’ असे पडले. ही देवी नंतर कमळात स्थानापन्न झाली. या मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती आहे, श्री महादेवीची पिंड आहे, तसेच गिरजासूर राक्षसाला पायाखाली मारल्याची प्रतिकृती केलेली आहे. येथे देवीच्या साहाय्याला श्री जोतिबा देव आल्याने त्याची मूर्ती आहे, तसेच शेजारी मारुतीची मूर्ती आहे. याच मंदिरात ५ फणाच्या नागाची मूर्ती असून त्यामूर्तीला फण्याला मारल्याची खूण स्पष्ट दिसते.
32 Shirala Nagpanchanmi | बत्तीस शिराळा नागपंचमी | Documentary | What is Battis Shirala famous for? | What is the history of Shirala? | How many villages are in Shirala? | battis shirala nag panchami 2025 | battis shirala nag panchami 2024 | battis shirala nag panchami 2025 live | battis shirala nag panchami live | battis shirala nag panchami 2024 live | battis shirala nag panchami dj | battis shirala nag panchami 2023 live | battis shirala nag panchami 2025 live today | battis shirala nag panchami |
बत्तीस शिराळा कशासाठी प्रसिद्ध आहे? | ३२ शिराळा हे नाव का आहे? | 32 शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव | Shirala Live | #sangli | #nagpanchami | #nagpanchami | #battisshirala | #livesnakeworship | #snakefestival | #sangli | #maharashtra | #indiantradition | #hindufestival | #snakedarshan | #breakingnews | #culturalheritage | #wildlife | #temple | #nagdevata | #ambamata | #aarti | #pooja | #puja | #pujavidhi | #pujapath | #पूजन | #आरती | #नागपालखी | #nagpalakhi | #shiralanagpalkhi | #nagpalkhilive | #32shiralalive | #liveshirala | #live32shirala | #shiralaambamata | #जगप्रसिद्धनागपंचमी | #nagpanchami | #nagpanchamispecial | #32shiralanagpachami | #shiralanagpachami | #जगप्रसिद्धनागपंचमीशिराळा | #शिराळा | #शिराळानागपंचमी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: