ganesh stuti, गणेशस्तुती अमृतराय,गणपती मुळ रुप, bapp sketch,ganpati 2025,
Автор: इति कला
Загружено: 2025-08-30
Просмотров: 264
📖 वर्णन (Description)
‘आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक…’
ही स्तुती म्हणजे सप्तस्वरांच्या माधुर्यातून उमटलेलं गणेशाचं अनुपम रूपवर्णन.
१७व्या शतकातील कीर्तनकार कवी अमृतराय यांच्या या काव्याला
ज्येष्ठ संगीतज्ज्ञ स्व. डॉ. अशोक दा. रानडे यांनी संगीतबद्ध करून ‘कलागणेश’ या संकल्पनेत सादर केलं.
ही रचना १४ मात्रांच्या आडाचौताल मध्ये, स्वर आणि तालांच्या अद्भुत संगमातून अवतरते.
🎙️ "संगीताचे सात स्वर… राग-रागिणींच्या सुरेल लहरी… आणि त्यातून प्रकटणारे गणनायकाचे दिव्य रूप. आजच्या काळात गणपतीचे बदलत चाललेले रूप पाहून अनेकदा आपण त्याच्या मूळ, पारंपरिक रूपाची जाणीव विसरत चाललो आहोत. पण या पद्यातून उमटणाऱ्या भावनांना आम्ही चित्ररूप देत, त्या मूळ रूपाचे दर्शन घडवणार आहोत. हे पद्य म्हणजे स्वर आणि भाव यांचा संगम आहे. चला तर मग, 'इति कला'च्या या सादरीकरणातून अनुभवूया — आनंददायी, मंगलदायी, गणनायकाची अद्भुत स्तुती."
🎶 Credits | श्रेय
✍️ कवी / लेखक : अमृतराय (१७वे शतक)
🎼 संकल्पना, संगीतदिग्दर्शन, निरूपण : स्व. डॉ. अशोक दा. रानडे
🎙️ गायक कलाकार : सुरेश बापट, कल्याणी साळुंके, शुचिता आठलेकर, प्राची दुबळे, समीर दुबळे, हर्षा भावे
🥁 वादक कलाकार : मकरंद कुंडले, नीला सोहोनी, राजेंद्र भावे, कृष्णा मुसळे, हरी बागडे, शेखर खांबेटे
📀 संकलन : श्री चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित कलागणेश (२ सीडी संच)
( या महिती मधे कहि तृटी असण्याची शक्यता नाकारता येनार नाही)
आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक
रुंड मथन करि जननी जनक निज रुंड मालधर
अमल कुंड तो तृतिय नयन परि तनय विनय
विभु वक्रतुंड निज धुंडिराज करि शुंड सरळ मुनी
धुंडिती जनी वनी झुंडनिकाबहु विकट तुंड गण
पुंडरीक मणी हार प्रलंबित
कुंडतीश कटिबंध तनुद्भव पुंड दमन मणी कुंडल
श्रुतीयुगी गंडस्थळी अळी चंद्रखंडरघर गुणगण मंडित
किर्ती अखंडित खंड दुरित चय पंडित गामिनी
तांडव करि जो पदमभवांडी मंडलाकृती चंड पराक्रम
विदण्ड खंडन विपक्ष दंडन स्वभक्त मंडन सुखात मुनिवर
सकल चराचर पावन करीनिज प्रसाद देवून पुरवी मनोरथ
विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक तो.. विघ्नविनाशक तो..
परम कृपालय भालविलस दली मालदान रसपान करिती
कलीकाल कापती परनिर्दाळण करित समरी जो
पालन करि सुर चालक त्रिभुवनी शंभुबाल भवजाल तेच जंजाळ
कटन कर वाल स्मरण ते सप्तताल करि
नृत्य सरस तो झुणझुणझुणझुण प्रणित नुपुरे खुळखुळखुळखुळ
वाले वाकी पदी फुंफुंफु करि नागबंध कटि
लळलळलळलळ ललित कुंडले चपचपचपचप न्यस्त पाऊले
किणीकिणीकिणीकिणी क्षुद्र घंटिका दणदणदणदण
उठति गुंजरव गुंगुंगुंगुं भ्रमर गुंजति खणखणखणखण ताल वाजती
धिक धिक धिलांग मृदूंग रवमृदु
धिमिधिमिधिमिधिमि किट थथथथ
थरीकिट थरीकिट सा रे ग म सा रे ग म प ध नि .. नि ध प म ग रे सा
सप्तस्वर मुखी भेद आलापित
स्वर वर्तुनिया वेष्टन संगीत तननम तननम राग रागिणी धृपद त्रिवट गती
गद्य पद्य विभुरुद्य सद्य करि
प्रबंध निबंध जगतल लगबग विसरुनी तटस्थ मौन्य मुद्रा पुरवी
सादर समुदायसवे आयकतो....
आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक.
⚠️ Disclaimer :
"या रचनेचे सर्व हक्क संबंधित गायक, संगीतकार व निर्मिती संस्थेचे आहेत. हा व्हिडिओ केवळ सांस्कृतिक, शैक्षणिक आणि रसिकतेसाठी सादर केला आहे. आमच्याकडे या गीतावर कोणतेही कॉपीराइट हक्क नाहीत.
जर तुम्हाला Marathi Historical Stories, Art आणि Short Videos आवडत असतील, तर इति कला चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
🔸 आमची ओळख
आम्ही घेऊन आलो आहोत पुरातन भारताचा वैभवशाली इतिहास, लोककला, हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा – म्हणजेच “इति कला”.
या आधी Rahul Kalambi या नावाने सुरू असलेले YouTube चॅनल आता नव्या रुपात आपल्यासमोर आले आहे. सदस्य व्हा आणि Marathi Historical Shorts च्या जगात हरवून जा.
🔸 आमचे उद्दिष्ट
आमचे ध्येय म्हणजे आपल्या परंपरेतील घटना, व्यक्तिमत्त्वे आणि कला सोप्या मराठीत, भावनिक आणि कलात्मक शैलीत मांडणे.
🔸 येथे काय पाहाल?
या चॅनलवर तुम्हाला –
Marathi Short Videos आणि long video मध्ये
इतिहासकथन,
pheta बांधणी चे विविध प्रकार ,
पारंपरिक ऐतिहासिक लोककला,
लाल-काळ्या Sketch Art Visuals,
भावनिक Storytelling with Voice Narration,
अशा अनोख्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील.
🔸 प्रेक्षकांसाठी उपयोगिता
इथे तुम्हाला Marathi Historical Content, प्रेरणादायी कथा आणि सांस्कृतिक वारसा कलात्मक दृष्टीकोनातून अनुभवता येईल.
🔸 आमंत्रण
जर तुम्हाला History, Art आणि Marathi Storytelling Shorts आवडत असतील तर इति कला चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या प्रवासात सहभागी व्हा.
🔸 अपलोड वेळापत्रक
दर आठवड्याला नवे मराठी इतिहास अपलोड होतात.
🔸 सोशल मीडिया / संपर्क
📩 संपर्क: [तुमचा ई-मेल] [email protected]
📌 Instagram / Facebook लिंक
या चॅनेलवरील सर्व व्हिडिओ, चित्रे, आवाज व इतर साहित्य हे इति कला चॅनेलचे मालकी हक्क असलेले आहेत किंवा योग्य परवानगी घेऊन वापरलेले आहेत.
काही साहित्य (चित्रे, ध्वनी, व्हिडिओ क्लिप्स) यांचे हक्क त्यांच्या मूळ मालकांकडे आहेत.
या सामग्रीचा वापर केवळ शैक्षणिक, संशोधन, माहिती व कला-संबंधित उद्देशासाठी भारतीय कॉपीराइट कायदा 1957 आणि U.S. Copyright Act, Section 107 (Fair Use) च्या तरतुदीनुसार करण्यात आला आहे
#iti-kala
#गणेशकाव्य
#ganeshsthapana
#marathi
#ganapti
#music
#lordganesha
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: