HUMAN ANATOMY - मानवी शरीराचे महावस्त्र - TEASER
Автор: SAMARTH BIOLOGY TUTORIALS LATUR
Загружено: 2025-09-22
Просмотров: 117
मला भारतीय विचारशास्त्रात म्हणजे #इंडिक_एपिस्टेमॉलॉजी मध्ये येणारी- "देह वस्त्र असल्याची" संकल्पना खूप भावते.
कबीरदासजी एक विणकर होते.
ते वस्त्र बनवायचे.
म्हणून त्यांच्या या रूपकाला विशेष महत्व आहे.
गीतेच्या "वासांसि जीर्णानी ..." या श्लोकावर भाष्य करताना माउली म्हणतात -
जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे ।
मग नूतन ते वेढिजे ।
तैसे देहांतराते स्वीकारिजे ।
चैतन्यनाथे ।।
कबीरदासजींच्या नंतरच्या शतकात, ह्युमन ऍनाटॉमी वरचे पहिले पुस्तक आले.
आंद्रियास व्हेसॅलियस चे हे पुस्तक होते -
फॅब्रिका ह्युमॅनि डि कॉर्पोरीस..
त्यानं देखील या पुस्तकात मानवी देहाला एक वस्त्र म्हटलं आहे.
२०२२ सालात त्यावर एक डॉक्युमेंटरी झाल्याचे ऐकले.
परंतु ती बघण्याचा योग आला नाही.
या पूर्वीच्या एका इंग्रजी भागात मी हे थोडक्यात घेतले होते.
पण आता हे "शिकू या NEET" च्या येणाऱ्या भागात आपण हे आणखी विस्तृतपणे बघणार आहोत. आणि त्यासोबत ऍनाटॉमी मध्ये येणाऱ्या काही महत्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: