अंजली दमानियांचा गिरीश महाजनांवर घणाघात; म्हणाल्या, 'त्यांना फेकून द्या' | Anjali Damania VS Girish
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-12
Просмотров: 851
नाशिकमधील झाडं तोडण्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये वृक्षतोडीविरोधात अनेक आंदोलनं झाली, मोठा विरोध झाला, तरीही प्रशासनाने आणि मंत्री गिरीश महाजन यांनी झाडं तोडली, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. 'एवढा विरोध होऊनही महाजनांना एवढी मस्ती आहे की त्यांनी नाशिकमधील झाडं तोडली', अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. लोकांनी कितीही आंदोलनं केली तरी महाजन यांनी त्यांच्या मनाचंच केलं, असं त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. 'गिरीश महाजन यांना राजकारणातून फेकून द्यायला हवं', असे विधानही अंजली दमानिया यांनी केले आहे. नाशिकच्या तपोवन आणि साधुग्राम परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या गाजत असून, यावर दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
#AnjaliDamania #GirishMahajan #Nashik #TreeCutting #Tapovan #MaharashtraPolitics #SaamTV #MarathiNews #Environment #NashikNews #SaveTrees #BJP #Politics #Maharashtra #Protest
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: