बारामती नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलल्याने उमेदवार आक्रमक | Baramati News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-30
Просмотров: 7777
बारामती नगरपालिकेची निवडणूक २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबरला होणार असल्याने अपक्ष उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अपक्ष उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाचा दुरुपयोग करून विशिष्ट पक्षाला मदत केली जात असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. निवडणूक लांबणीवर पडल्याने प्रचाराचा खर्च वाढणार असून तो कोणी करायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काहींनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, म्हणजे अर्ज भरण्यापासून ते चिन्ह वाटपापर्यंत, पुन्हा नव्याने राबवण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने सर्वांना समान न्याय द्यावा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन उमेदवारांनी केले आहे. तसेच, केवळ अर्ज भरलेल्यांनाच माहिती दिली जात असून, लोकशाहीत हा प्रकार चुकीचा असल्याचे मत उमेदवारांनी मांडले आहे.
#Baramati #NagarParishad #ElectionPostponed #IndependentCandidates #MaharashtraPolitics #ElectionCommission #LocalElections #Pune #Democracy #Voting #PoliticalNews #MarathiNews #SaamTV #ElectionUpdate #BaramatiNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: