माजिवडा मठातील 🌟 दत्तजयंती उत्सव 💥
Автор: ShreeSwamiSamarthaSaiDatta
Загружено: 2025-12-07
Просмотров: 171
🪷 श्री स्वामी समर्थ 🪷
स्थळ: श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. येथील गुरुवार व
दत्तजयंती निमित्त दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने , पूजा-अर्चा,पाळणा विधी व भाविकांना दर्शन 🪷 तसेच बाबांच्या (श्री विजयकुमार देशमुख) यांच्या काळातील साईबाबांच्या 👑मुकुटामध्ये मठातर्फे नविन चांदिची भर घालुन नविन मुकुट तयार करण्यात आला.👑 दत्तजयंतीच्या शुभ मुहूर्तावर साईबांना परीधान करणे 🪷असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तिमय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
📖🔔गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ ते बुधवार दिनांक ३ डिसेंबर २०२५ पर्यंत 🔔
🪷दत्तजयंती निमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्यात आला.गुरुवार व दत्तजयंतीच्या शुभदिनी पहाटे मंदिरात वेदघोषांनी कार्यक्रमास प्रारंभ झाला🌹.
मुख्य पुजाऱ्यांनी शास्त्रोक्त विधीनुसार पुढील पूजाविधी पार पाडले:
गणेशपूजन ,संकल्प, सर्व देवांचे व श्री दत्तात्रेय अभिषेक पंचोपचार / षोडशोपचार पूजा,पूजादरम्यान संपूर्ण मंदिर परिसर मंत्रोच्चारांनी पवित्र झाला.
दत्तजन्माचे प्रतीक म्हणून मंदिरात विशेष पाळणा आकर्षक फुलांनी, दीपांनी व पारंपरिक सजावटीने अलंकृत करण्यात आला. दिवसभर भक्तांची गर्दी होती.
निश्चित मुहूर्तावर पुजाऱ्यांनी मंगल मंत्रांच्या घोषात श्री दत्ताचे पाळण्यात घालणे या विधीचे पालन केले. भाविकांनी आनंदाने "जय गुरु दत्त" चे घोष उच्चारले. या क्षणी वातावरण भक्तिभावाने भारावून गेले.
पाळणा बोलण्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे पार पडला:
स्त्रिया व भारत टॉवर महिला भजन मंडळाच्या वतीने पारंपरिक दत्तजन्माच्या ओव्या
दत्तमूर्तीचे गुणगान व स्तुतीपर भजने,
पाळणा हलविताना मंगलगाणी व दत्त स्तोत्र
पाळणा बोलण्याने वातावरणात आनंद, उत्साह व अध्यात्मिकता पसरली.
दिवसभर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती.
मंदिर व्यवस्थापनाने दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था केली व सर्वांची सोय निर्विघ्न पार पडली.
संध्याकाळी आरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सेवेकऱ्यांनी अत्यंत समन्वयाने प्रसादाची व्यवस्था केली.
दत्तजयंतीचा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तिमय, शांत आणि सोहळ्यपूर्ण वातावरणात पार पडला. मंदिर व्यवस्थापन, पुजारीवर्ग, सेवेकरी, भजन मंडळ व सर्व भाविक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: