ऋणानुबंध...♥️🥰 नको असलेली शिक्षक बदली
Автор: Sarpanch Sandesh Mahadik
Загружено: 2025-12-11
Просмотров: 99
#ऋणानुबंध
९ वर्षापूर्वी आमच्या रायगड जिल्हा परिषद खर्डी शाळेत लक्ष्मी आली दिप्ती दिनेश गावंड मॅडम म्हणजेच शाळेच्या मुख्याध्यापिका.. शाळेत हजर झाल्यापासून त्यांनी शाळेतील मुलांवर मनापासून प्रेम केले, शाळेचा पट ७ झाला होता तो त्यांनी ३२ केला पालकांमध्ये आपलेपणा निर्माण केला ग्रामपंचायत म्हणून आम्ही सर्व मदतीला होतोच पण या मॅडमनी विद्यार्थी, पालक यांच्यापुरतेच मर्यादित न राहता गावातील प्रत्येक ग्रामस्थांशी, महिलांशी, तरुणांशी, चाकरमानी मंडळींशी आपुलकीचे नाते जोडले आणि बघता बघता शाळेचे रूप बदलले त्यानंतर ६ वर्ष ४ महिन्यापूर्वी दुसरी लक्ष्मी आली राखी घोसाळकर मॅडम शाळेच्या शिक्षिका.. त्यानंतर ६ वर्षापूर्वी नविनच रुजू झालेले आणि या दोन्ही बहिणींना साथ देण्यासाठी आले उमाकांत कदम सर.. या त्रिकुटानी अक्षरशः मग कमालच केली शाळा डिजिटल करण्यापासून ते शाळेला केंद्राचे नाव मिळेपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. प्रत्येक संकटाचा सामना करून यश मिळाले आणि सर्व काही सुरळीत सुरू असताना शाळेसाठी, गावासाठी पुढील नाविन्यपूर्ण योजनांचे नियोजन करत असताना काही महिन्यापूर्वी राखी मॅडम यांची बदली झाली ती विनंती बदली होती म्हणून सर्वांनी मान्य केले परंतू दिप्ती गावंड मॅडम यांची बदली होऊ नये हे सर्वांना मनोमन वाटत होते कारण शाळेच्या प्रगतीसोबत खर्डी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मॅडमचे योगदान लाखमोलाचे आहे ग्रामपंचायतीला आणि सरपंच म्हणून मला मिळालेल्या प्रत्येक पुरस्कारात सिंहाचा वाटा हा त्यांचा आहे बदली होऊ नये यासाठी आम्ही ग्रामस्थांनी एवढे प्रयत्न करून सुद्धा मॅडमची बदली थांबली नाही याच अतिशय दुःख होत आहे काल आम्ही निरोप दिला नाही कारण या दोन्ही लक्ष्मीचे सर्वांशी ऋणानुबंध जोडले आहेत.
पुन्हा दिप्ती दिनेश गावंड मॅडम बदली होऊन आपल्या खर्डी शाळेवर याव्यात असे ग्रामदैवतेला साकडे घालून दोघींनाही माहेरची ओटी भरून जड अंतःकरणाने प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या😔
#khardi #mahad #raigad #kokan #maharashtra #india
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: