Ahilyanagar Mahapaur | विखे-जगताप जोडी धक्कातंत्र अवलंबणार? नगरचा महापौर ठरला...
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-01-23
Просмотров: 6204
अहिल्यानगरचा महापौर कोण होणार? याचं उत्तर गुरुवारी मिळालं. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालं. गुडघ्याला बाशिंग बांधून उभ्या असलेल्या, पुरुष नगरसेवकांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारं हे आरक्षण निघालं. नगरच्या सत्तेची दोरी आता महिलांच्या हाती जाणार आहे. आता जे आरक्षण निघालंय, त्या आरक्षित जागेवर सगळ्याच पक्षांच्या तब्बल नऊ महिला निवडून आल्या. शिवाय ओपनच्या जागेवरही तीन ओबीसी महिला निवडून आल्या आहेत. सत्ता सोपानाच्या गोळाबेरजेत, ज्या महिला नगरसेविकांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे परंतु त्या ओपनच्या जागेवर निवडून आल्या आहेत, त्यांनाही महापौर पदाचा दावा करता येतो. अर्थात, हे सगळं त्या-त्या पक्षांच्या विचारसरणीवर अवलंबून असतं. म्हणजेच, एखाद्या पक्षाने ओपनमधून निवडून आलेल्या त्यांच्या ओबीसी नगरसेविकेला महापौर करण्याचं ठरवलं, तर ते करता येतं. आता हाच नियम लक्षात घेतला तर, नऊ नाही तर 12 महिला नगरसेविका या महापौर दावेदार ठरतात. हा, पण विखे-जगताप ठरवतील तोच निर्णय या महानगर पालिकेत होईल.... अशी सध्यातरी गणिते आहेत. कोण नगरसेवक होणार? काही धक्कातंत्र पहायला मिळेल का? हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत.
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: