अहिल्यानगरची स्थानिक गुन्हे शाखे कडुन 1 लाख 75 हजार रू किमतीचा चायना नायलॉन मांजाचा मुद्देमाल जप्त
Автор: MJ News 90
Загружено: 2025-12-03
Просмотров: 198
विक्रीस बंदी असलेला, पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा करणारा प्लास्टीक नायलॉनचा चायना मांज्याची विक्री करणा-यासाठी घेवुन जाणा-या आरोपीकडुन 1,85,00/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला व पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा करणारा प्लास्टीक, नायलॉनचा चायना मांजा विक्री करणारे इसमा विरुध्द कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सुनिल पवार, संतोष खैरे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दिपक घाटकर, बिरप्पा करमल महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत अशा पोलीस अंमलदारांचे विशेष पथक नेमुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
पथकाने दिनांक 01/12/2025 रोजी अहिल्यानगर शहरात पेट्रोलिंग फिरुन प्लास्टीक किंवा नायलॉन चायना मांजा विक्री करणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास अहिल्यानगर शहरातील जी.एल.पी. टॉवर लिंकरोड केडगांव या ठिकाणी होंडा कंपनीची विना नंबरची ऍ़क्टीवार एक इसम त्याचे पाठीमागे दोन बॉक्स बांधुन घेवुन जात असतांना दिसला. तेव्हा पथकाने त्यास थांबवुन पोलीसांची ओळख सांगुन त्याचे नांव गाव विचारले असता, त्याने त्याचे नांव विशाल कुमार दळवी वय - 30 वर्षे रा. आरती रो हाऊसिंग भुषणनगर केडगांव ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यास सदर बॉक्समध्ये काय आहे. याबाबत विचारपुस करता त्याने सदर बॉक्समध्ये नायलॉन मांजा असुन ते विक्री करण्यासाठी घेवुन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यातील इसमाचे कब्जातुन 1,10,000/-रुपये किंमतीची 110 नग मोनो काईट, मोनो फायटर व गोल्ड असे नाव असलेले प्लास्टिक नायलॉन मांजा, 75,000/-रु कि.ची एक मोटार सायकल असा एकुण 1,85,000/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याचेविरुध्द पोहेकॉ/492 सुनिल विनायक पवार नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाणे गु.र.नं. 1093/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 125 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम क. 5, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.#mjnews90 #news #come #people #crime #police #ahmednagar #अहमदनगर #महाराष्ट्र #छत्रपतीशिवाजीमहाराज #अहिल्यानगर #पोलीस #पोलीसभरतीमहाराष्ट्र
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: