जिल्हास्तरीय पहिले झाडीपट्टी साहित्य संस्कृती संमेलन २०२५ (दिवस पहिला)
Автор: SSJCOLLEGE OFFICIAL
Загружено: 2025-11-27
Просмотров: 2593
Contact For Live Streaming : Mehandi Graphics, 9420919283
सप्रेम नमस्कार !
पूर्व विदर्भातील तलावांचा जिल्हा म्हणून सुप्रसिद्ध असलेला गोंदिया जिल्हा आपल्या नैसर्गिक सौंदर्य, पारंपरिक लोककला, आदिवासी नृत्य आणि गोंडी चित्रकला या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. पद्मश्री स्व. मारुती चितमपल्ली यांचे मौलिक लेखन याच परिसरातील नवेगाव बांध येथे आकाराला आले आहे. या जिल्ह्यातील शेवटचा तालुका म्हणजे अर्जुनी मोरगाव. हा प्रदेश ग्रामीण, आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त आहे. या अर्जुनी मोरगाव मध्ये आमच्या श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय गेल्या ३५ वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करीत आलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, ग्रामीण भागातील युवकांना क्रमिक अभ्यासाशिवाय साहित्याची, कलेची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात मराठी भाषेविषयी अधिक रुची निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती अधिकाधिक रुजावी या उद्देशाने आमच्या महाविद्यालयात श्री. दुर्गा शिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक २८ आणि २९ नोव्हेंबर २०२५ ला मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अनुदानित दोन दिवसीय झाडीपट्टी साहित्य -संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. झाडीपट्टीचे साहित्य, लोककला, लोकसंस्कृती यावर अनेक लेखक समीक्षक यांचे मौलिक विचारमंथन यातून घडणार आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: