दाभोळ स्वस्त मच्छि मार्केट 🦐 | Dabhol Fish Market - Auction दाभोळ दापोली (Konkan)
Автор: S FOR SATISH
Загружено: 2021-01-03
Просмотров: 190788
दाभोळ स्वस्त मच्छि मार्केट 🦐 | Dabhol Fish Market - Auction दाभोळ दापोली (Konkan) दापोली तालुक्यातील दाभोळ बंदर येथे दाभोळ फिश मार्केट अतिशय स्वस्त माशांचे मार्केट आहे. आम्ही निखिल आणि मी दाभोळ फिश मार्केटला भेट दिली होती. या फिश मार्केटमध्ये सर्व प्रकारचे मासे खरेदी करता येतात. संध्याकाळी दररोज चार वाजता या लिलाव आणि मासळी बाजार असतो. सुरमई, बांगडा, पापलेट, हलवा, मुशी, मांदेली, रावस असे नानाप्रकारचे मासे विक्रीला असतात. वनौशी वरून आम्ही मासे खरेदी करायला खास दाभोळ फिश मार्केटमध्ये आलो होतो. आम्ही मालवणी बांगडे आणि ताजे लेपा मासे घेतले. दाभोळ बंदर हे एक ऐतिहासिक बंदर आहे. अरबी समुद्रातून मासेमारी करून दाभोळ बंदर येथे मासे विक्री केले जातात. दाभोळ येथे दरदिवशी माशांचा लिलाव असतो. लिलावात मासे अतिशय स्वस्त दरात खरेदी करता येतात. कोकणात बरेच मासळी बाजार आहेत जिथे स्वस्त मासे मिळतात त्यातील एक दाभोळ बंदर येथील मासळी बाजार आहे. #DabholFishMarket #DabholFishAuction #DabholDapoli #sforsatish
मी बऱ्याच मासळी बाजारांना भेटी दिल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी माशांचा भाव कमी जास्त असतो. दाभोळ येथील मासळी बाजारात मासे अतिशय स्वस्त आहेत. कोकणातील सर्वात स्वस्त आणि मोठे मासळी बाजार आणि लिलाव दापोली तालुक्यातील हर्णे येथे असतो. इथे सुद्धा दरदिवशी सायंकाळी चार वाजता माशांचा लिलाव असतो. माशांच्या लिलावात मासे स्वस्त मिळतात. मासे खरेदी करताना बोली लावल्या जातात. स्थानिक मासे विक्री करणाऱ्या महिला खास मासे लिलावात मासे खरेदी करायला येतात. दाभोळ मार्केटमध्ये सामान खरेदी करून झाल्यावर माणसे दाभोळ मासळी बाजारातून मासे खरेदी करतात. जेव्हा मासे जास्त मरतात तेव्हा मासळी आणखी स्वस्त होते. दाभोळ मासळी बाजारात मासे खरेदी करायला आजूबाजूच्या गावातील माणसे येत असतात. दाभोळ खाडी पार केल्यावर गुहागरचा परिसर लागतो. समुद्री किनारी राहणाऱ्या लोकांच्या जेवणात मासे विपुल प्रमाणात असतात. आजकाल बरेच पर्यटक अशा मासळी बाजारातून मासे खरेदी करून हॉटेलवर मासे फ्राय आणि कालवण तयार करायला नेतात. बांगडा कालवण आणि फ्राय खूप छान बनतं. आम्ही मालवणी बांगडे फ्राय केले आणि लेपाचे कालवण तयार केले. बांगडा आणि लेप माशाचे तव्यावरील फ्राय दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाभोळ येथील स्वस्त मासळी बाजार आणि इथला परिसर दाखवला. दाभोळ मासळी बाजाराचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: