नगर जिल्हा पुन्हा हादरला, कंदुरीच्या कार्यक्रमात गोळीबार, एकाचा मृत्यू
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-01-12
Просмотров: 23865
नेवासा तालुक्यातील चांदा येथे, कंदुरीच्या कार्यक्रमात गोळीबार झाला. रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान झालेल्या या गोळीबारात तेथीलच शाहिद शेख या युवकाचा मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाले. शाहिद हा त्या कंदुरीच्या कार्यक्रमात, बोकड कापण्यासाठी गेला होता. तेथेच किरकोळ वाद होऊन त्याच्यावर थेट गोळीबार झाला. नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा गावठी कट्टे व त्यातून होणाऱ्या गोळीबाराचे प्रकार वाढले आहेत. गेल्या पाच वर्षांतील बातम्या पाहिल्या, तर गोळीबाराच्या तब्बल 50 पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. नगर जिल्ह्यातील गावठी कट्ट्याचे हे रॅकेट, पुन्हा एकदा डोकेदुखी ठरु पाहत आहे. चांदा येथील घटना नेमकी काय, व गावठी कट्ट्यांचे कनेक्शन काय, हाच विषय आज आपण समजून घेऊयात...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: