चला.. एका गोष्टीसाठी तरी सगळे धर्म एकत्र आले | Chitra Palekar I Woman ki Baat | Mugdha Godbole
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2025-05-10
Просмотров: 173943
#chitrapalekar #आरपार
लेखिका, अभिनेत्री, निर्माती.. एक बहुगुणी स्त्री; सक्षम आणि निर्भीड अशी ओळख असलेल्या चित्रा पालेकर. अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये आयुष्यभर राहून सुद्धा आपली स्वतःची एक ओळख निर्माण करून ह्या जगात वावरणं, तसं कठीणच असतं. स्त्री-पुरुषाचा भेद जरी आज तितकासा राहिला नाही तरी स्वतःची ओळख घेऊन फिरणं आणि ते टिकवून ठेवणं एखाद्या स्त्रीसाठी किती आव्हानात्मक आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.
आपल्या मुलीचं लेस्बियन असणं — या इतक्या वैचारिक दृष्ट्या अवघड गोष्टीला स्वीकारून पुढे चालत राहणं आणि उघडपणे समाजापुढे आपल्या पोरीच्या मागे खंबीरपणे उभी राहणं — हे एखाद्या स्त्रीसाठी किती अवघड असू शकतं याची कल्पना सुद्धा करणे आपल्या सर्वांसाठी शक्य नाही. या सगळ्या गोष्टींना तोंड देतानाचा प्रवास कसा होता हे त्यांनी सांगितलं.
अशाच विविध क्षेत्रातील नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठीच आपण Woman Ki Baat मध्ये अशा कर्तबगार स्त्रियांना बोलवत असतो. आज अशीच एक निर्भीड स्त्री आरपारवरती समाजातल्या काही समस्यांकडे वेगळ्या पद्धतीने कसं बघायचं हे सांगायला आली आहे.
0:00 - परिचय.
4:55 - आत्मकथेची सुरुवात.
9:30 - का बरं बायकांनी नाव बदलावं?
20:30 - मी चुकीच्या काळात जन्माला आले.
23:30 - प्रसिद्ध लोकं सुद्धा आपल्यासारखीच साधी असतात.
39:10 - रेखाच्या भेटीचा किस्सा.
42:30 - अमोल पालेकर सोबतचं Separation.
49:03 - मी आणि अमोल त्या बद्दल बाहेर बोललोच नाही
53:47 - म्हणून आडनाव अजूनही 'पालेकर' लावते.
1:00:31 - लेसबिन असणं म्हणजे काय गुन्हा नाही
1:08:41 - लैंगिकता ही एक नसते, it's a spectrum!
1:12:40 - पालकांना कुटुंबाची लाज जास्त महत्त्वाची वाटते.
1:19:39 - पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे.
1:26:10 - समलैंगिकांना फक्त शिव्या देणारे शब्द आहेत.
1:29:40 - पालकांना या गोष्टीसाठी तयार केलं!
आभार
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: