Margashirsha Devi Utsav | मार्गशीर्ष देवी उत्सव | शुभात्रेयी देवीचे रूप
Автор: Astitva Talks
Загружено: 2025-12-23
Просмотров: 50
शुभात्रेयी
अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्या प्राप्त व्हावी. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवांच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी ( साक्षात आदिशक्ती ) नावाची कन्या अत्रीऋषीं आणि अनुसयेच्या उदरी जन्मला आली.
शुभात्रेयी🌻
कथामंजिरी ३/११७ व तुलसीपत्र १४९८
ह्या अग्रलेखात ब्रह्मवादिनी शुभात्रेयींचा उल्लेख आला आहे.
याज्ञवल्क्य सांगतात,मंत्रगजर चोरणे म्हणजे दत्तात्रेयभगिनी शुभात्रेयीदेवींच्या पादुका चोरणे.
ही ब्रह्मवादिनी "ब्रह्मवादिनी म्हणजे अशी स्त्री जी ब्रह्मविद्येची अभ्यासिनी आहे, ब्रह्मज्ञानाचा शोध घेणारी आहे किंवा वेदांची रचना करणारी आहे".
शुभात्रेयी म्हणजे भगवान अत्रि व भगवती अनसूया ह्यांची कनिष्ठ कन्या अर्थात् भगवान दत्तात्रेयांची सख्खी धाकटी बहीण. ही दत्तात्रेय भगिनी सदैव माता-पित्याबरोबर( अत्री ऋषी आणि माता अनुसूया ) राहून त्यांची सेवा करीत असते व हिलाच स्वतः अनसूया मातेने त्रिविक्रमाची (भगवान विष्णू - वामन अवतार ) यांची उपासना देण्याची प्रथम दीक्षा सत्ययुगातच दिलेली आहे- जेव्हा वेद लिहिले जात होते.भगवान त्रिविक्रमाच्या भक्तांची काळजी घेणे हाच तिचा निर्धार आहे. हिचा त्रिविक्रम कसा आहे हे तिच्याच शब्दांत,
"ज्याच्या मस्तकी राहती श्रीदत्त।
जगदंबा करी निवास ज्याच्या हृदयचित्तात"
हनुमंत स्वतः आहे ज्याचे हस्त
असा असे हा एकमेव अद्वितीय त्रिविक्रम दत्त प्रदत्त।
ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे त्रिविक्रमाची माता
श्रीविद्या हिचे मानवी स्वरूप आणि म्हणून
शुभात्रेयी ही त्रिविक्रमाची माताच.
हिने मंत्रगजर सर्व श्रद्धावानांसाठी खुला केला.
ह्या दत्तात्रेय भगिनीस अर्थातच मृत्यूचे बंधन नाही, काळाचे बंधन नाही, परंतु तिने स्वतःचे सर्व तपोबळ तिच्या पादुकामध्ये ठेवून दिले आहे. केवळ एकाच गोष्टीसाठी - श्रद्धावानाकडे पुण्य जराही नसले, तरीदेखील त्याला मंत्रगजर करता यावा म्हणून.
ह्या तिच्या पादुका हिमालयातील एका गुप्त स्थानावर सुरक्षित ठेवल्या गेल्या आहेत, कारण त्रिगुणात्मक त्रैमूर्ति भगवान दत्तात्रेयांच्या रचनेनुसार जोपर्यंत ह्या पादुका अशुद्ध जलात विसर्जित होणार नाहीत, तोपर्यंत हा महामंत्र, हा मंत्रगजर श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ बलस्थान असेल व ते बलस्थानच ह्या दुष्ट परंपरेला म्हणजे वाईट वृत्तीला चोरावयाचे आहे.
|| ॐ श्री गुरुदेव दत्त ||
|| ॐ श्रीदत्तात्रेयाय नमः ||
वर्ष १५ वे, आईने एका नव्या रूपात तितक्याच उत्साहाने नव चैतन्य आणि उमेद देऊन आईने तिची सेवा यथासांग करवून घेतली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष कृष्ण पक्ष १४ गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी आमच्या राहत्या घरी आदिशक्तीच्या एका नव्यारूपाची स्थापना करण्यात आली आहे, तरी भक्तांनी आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा. दिनांक १८ डिसेंबर २०२५ ते २२ डिसेंबर २०२५ आपण आपल्या सवडीने दर्शन घेण्यास येऊ शकता.
पत्ता:- रूम न.१२,आनंद छाया सोसायटी ( चाळ) ज्ञानसाधना कॉलेज जवळ, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, परबवाडी,ठाणे वेस्ट-४००६०४
मोबाईल नंबर -९६१९०५३३२७
मूर्तिकार: श्री अभिषेक सुंका
संकल्पना,सजावट आणि विशेष आभार : आमचे मित्र परिवार श्री दिलीप वैती (दादा ), स्वप्नाली विनय टिकम,साईराज उद्योग,ओंकार उद्योग दिनेश जगताप आणि श्याम मटकर सहपरिवार.
For collaboration, inquiries or feedback, kindly contact on [email protected], or WhatsApp DM on 9167635535
Film making by :- / pratik_botekar
Astitva Talks :- / astitvatalks
WhatsApp DM on https://surl.lu/rlldqb
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: