मुधोलीचे सात राजे | ताडोबा जवळील मुधोली गावातील विरगळ Virgal in Mudholi near Tadoba Tiger Reserve
Автор: Explore with Dr. Jayant Wadatkar
Загружено: 2024-10-18
Просмотров: 332
मुधोलीचे सात राजे
ताडोबा जवळील मुधोली गावातील विरगळ
युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकाच्या स्मरणार्थ उभारलेला स्मृती स्तंभ अर्थात विरगळ हा प्रकार महाराष्ट्रातील अनेक गाव खेड्यात किंवा किल्याच्या पायथ्याच्या गावात बघावयास मिळतो. त्या मानाने विदर्भात फारशा ठिकाणी विरगळ किंवा सतीशिळा आढळून येत नाहीत, किंवा विदर्भात त्यांचा फारसा अभ्यास झाला नाही किंवा Documentation झाले नसावे असे वाटते. मला एकदा ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथून परत येतांना मुधोली गावात विरगळ आढळून आल्या होत्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा किंवा भद्रावती येथून ताडोबा व्याघ्रप्रकल्पच्या मोहर्ली गेट कडे जातांना मध्ये मुधोली गाव लागते. या गावाच्या वेशीवर एका ओट्यावर सुमारे ८-१० विरगळ मांडून ठेवलेल्या दिसतात. मी एकदा ताडोबा येथून परत येतांना माझे लक्ष तिकडे गेले, प्रथम गावातील देव असावे असे वाटले मात्र गाडी थांबवून बघितले असता त्या विरगळ असल्याचे लक्षात आले.
महाराष्ट्राच्या इतर भागात सापडणाऱ्या विरगळ पेक्षा कारागिरीच्या दृष्टीने थोडा दुय्यम अशा ह्या विरगळ आहेत. मात्र वर असलेल्या चंद्र व सूर्य तसेच त्यावर असलेली सैनिक किंवा वीराची प्रतिमा बघता त्या विरगळ असल्याचे लक्षात येते. या विरगळ पैकी पहिलीवर दोन सैनिक गदा युद्ध करतांना दाखविले आहे मात्र यावर चंद्रसूर्य नसल्याने ही विरगळ आहे कि नाही ते सांगता येणार नाही. दुसरा दगड विरगळ असून त्यामध्ये वीर हा घोड्यावर बसून जात असल्याचे दिसते. तिसरी विरगळ सुद्धा घोड्यावर बसून जाणाऱ्या वीराची आहे, मात्र या दगडाची झीज झाल्याने शिल्प नेमके लक्षात येत नाही. चौथ्या विरगळ वरील वीर हा हातात भाला व ढाल घेऊन लढतांना दिसत आहे. पाचव्या विरगळ वरील सैनिक धावत्या घोड्यावर बसून भला फेक्तांना दिसत आहे. सहाव्या व सातव्या विरगळ वरील वीर सुद्धा घोड्यावर बसलेले असून शिल्प अस्पष्ट असल्याने त्यांच्या हातातील शस्त्र लक्षात येत नाही. शेवटची म्हणजे आठवी विरगळ तुटलेली असून सुद्धा त्यावरील वीर हा धावत्या घोड्यावर बसून जोशपूर्ण आवेशात तलवार फिरवीत असल्याचे दिसून येते. येथून जवळच असलेल्या भाताला या गावातील पुरातन मंदिरासमोर सुद्धा एक विरगळ ठेवलेली आहे. या विरगळ चे वैशिठ्य म्हणजे चौकोनी आकाराची असून यावर चारही बाजूने प्रतिमा कोरलेल्या दिसतात. या भागातील विरगळ चा अभ्यास करणे आवश्यक आहे.
Explore Historical Forts and Temples, Historical and unknown places, nature & Wildlife of Vidarbha
#viralvideo #virgal #satisheela #satishila #tadobajunglesafari #tadobanationalpark #tadoba #tadobaandharitigerreserve
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: