फलटणकरांनी ‘मास्टरमाईंड’ला पुण्याला धाडले; विरोधकांचा अस्त झाला - जयकुमार गोरे
Автор: Sthairya
Загружено: 2025-12-25
Просмотров: 24464
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर गजानन चौक येथे आयोजित भव्य विजय सभेत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी खणखणीत शब्दांत मोठी घोषणा केली. “फलटणकरांनी विकासाच्या बाजूने कौल देत ३५ वर्षांची प्रवृत्ती हद्दपार केली आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता द्या, रस्त्यांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी आणतो,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
याच सभेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना सज्जड दम देत, “आता कम्फर्ट झोनमधून बाहेर या. माझ्यापर्यंत तक्रार येईल असे काम करू नका,” असा स्पष्ट इशारा दिला. विरोधकांवर जोरदार टीका करत गोरे यांनी, “विकासाला अडथळे आणणाऱ्या राजकारणाचा अस्त झाला आहे,” असे सांगितले.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ऍड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनीही विकास, खड्डेमुक्त रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छ शहराचा निर्धार व्यक्त केला.
संपूर्ण विजय सभा, नेत्यांची भाषणे आणि मोठ्या घोषणा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
दैनिक स्थैर्यला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये लिहा.
#स्थैर्य #फलटण #मराठीन्युज #विजयसबा #जयकुमारगोरे #रणजितसिंहनिंबाळकर #नगरपरिषद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: