पिझ्झा रेसिपी - | Avishri Marathi Receipe |
Автор: Avishri
Загружено: 2026-01-02
Просмотров: 25
🧾साहित्य
रेडीमेड पिझ्झा बेस – 1
पिझ्झा सॉस/ टोमॅटो सॉस + शेझवान चटणी मिक्स सॉस)– 3–4 टेबलस्पून
मोझरेला चीज – 1 कप किसलेले
कांदा – 1 (पातळ चिरलेला)
टोमॅटो – 1 (बिया काढून पातळ चिरलेला)
कॅप्सिकम – ½ कप (चिरलेला)
स्वीट कॉर्न -½ कप
पनीर क्युब्स-½ कप
मीठ – चवीनुसार
ओरिगॅनो – ½ टीस्पून
चिली फ्लेक्स – ½ टीस्पून
बटर / तेल – 1 टीस्पून
👩🍳 कृती
1️⃣ पिझ्झा बेस तयार करणे
पिझ्झा बेसच्या एका बाजूला हलके बटर किंवा तेल लावा.
तवा किंवा कढईवर 1–2 मिनिटे बेस हलका कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
2️⃣ टॉपिंग लावणे
भाजलेल्या बाजूवर पिझ्झा सॉस समान पसरवा.किसलेले चीज घाला
त्यावर कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम व इतर टॉपिंग घाला.
वरून मीठ, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स शिंपडा.
शेवटी भरपूर किसलेले चीज , बटर घाला.
3️⃣ शिजवणे
ओव्हनमध्ये:
180°C वर 10–12 मिनिटे चीज वितळेपर्यंत बेक करा.
कढईत (ओव्हन नसेल तर):
जाड कढई गरम करा, त्यात स्टँड ठेवा.
ताटाच्या तळाला आणि कडांना थोडे तेल किंवा बटर लावा (चिकटू नये म्हणून).
तयार केलेला पिझ्झा त्या ताटावर ठेवा.
जाड कढई / कुकरमध्ये खाली स्टँड किंवा मीठ पसरवा.
त्यावर ताट ठेवा.
झाकण लावून मंद आचेवर 15–20 मिनिटे शिजवा.
चीज वितळले आणि तळ हलका ब्राऊन झाला की पिझ्झा तयार
🍽️ सर्व्हिंग
गरमागरम पिझ्झा कापून सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: