श्री मनाचे श्लोक अर्थासहीत १३१ - १३३ | Shree Manache Shlok with meaning | समर्थ रामदास स्वामी
Автор: Satwik Pathan | सात्विक पठण
Загружено: 2024-03-26
Просмотров: 407
@SatwikPathan
समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक अर्थासहीत | Manache Shlok with meaning | Manache Shlok 131 to 133
समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक १३१ ते १३३ अर्थासहित | Manache Shlok | Samarth Ramdas Swami
श्री समर्थांचे 'मनाचे श्लोक' म्हणजे मानसशास्त्रावरील एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. सामान्य माणसाला तसेच साधकाला, श्री समर्थांनी मनाला 'मना सज्जना' संबोधून आधुनिक मानसशास्त्रानुसार उपयुक्त स्वयंसूचनाच दिल्या आहेत. जर लहानपणापासून मनाच्या श्लोकांचे वाचन, मनन, चिंतन झाले तर ताण-तणावाची समस्याच उरणार नाही. मन निरोगी ठेवण्यासाठी 'मनोबोध' हा दवाखाना आहे. त्याचे औषध घेतले की मन निरोगी होईल. 'मनाचे श्लोक जीवन कसे जगावे हे शिकवतात.
मी मनाचे श्लोक आणि त्याचे अर्थ 'मना सज्जना ' या पुस्तकातून घेतले आहे. या पुस्तकाचे लेखक प्रा. हेमंत गोखले आहेत.
श्लोक १३१ ते १३३
भजाया जनीं पाहतां राम येकु ।
करीं बाण येकु मुखीं शब्द येकु ।
क्रिया पाहतां उधरे सर्व लोकु ।
धरा जानकीनायकाचा विवेकु ।।१३१ ।।
विचारुनी बोले विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त ते ही निवाले ।।
बरे शोधल्यावीण बोलों नको हो।
जनीं चालणें शुध नेमस्त राहो ।।१३२ ।।
हरिभक्त वीरक्त विज्ञानरासी ।
जेणें मानसीं स्थापिले निश्चयासी।।
तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे ।
तया भाषणें नष्ट संदेह मोडे ।।१३३ ।।
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: