Pratapgad Killa | प्रतापगड किल्ला संपूर्ण माहिती व इतिहास !
Автор: Anand Shidture
Загружено: 2024-03-09
Просмотров: 1352
Pratapgad Killa | प्रतापगड किल्ला संपूर्ण माहिती व इतिहास !
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या काही किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो. किल्ले प्रतापगड हा सह्याद्री रांगेत, सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. चढाई साठी सोपा असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3543 फूट उंच असून मराठ्यांच्या पराक्रमामुळे याची उंची आभाळाला टेकली आहे. जावळी खोऱ्यात अगदी घनदाट अरण्यात हा किल्ला वसवला गेला आणि म्हणून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो.
किल्ल्याचे नाव : प्रतापगड
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
समुद्रसपाटी पासून उंची :3543 फूट
चढाई: सोपी
ठिकाण:सातारा,महाराष्ट्र
pratapgad
प्रतापगड
pratapgad fort,
प्रतापगड किल्ला
pratapgad fort
किल्ला प्रतापगड
pratapgad killa
प्रतापगड किल्ला माहिती
satara pratapgad
प्रतापगड किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार
pratapgad fort entrance
अफझलखानाचा वध
किल्ले प्रतापगड इतिहास
इ.स. 1656 च्या दरम्यान स्वराज्याची नवीन घडी बसत होती. जावळी चा प्रदेश स्वराज्यात असावा असे महाराजांना वाटत होते. कारण ज्याच्या कडे जावळी प्रदेश त्याचा बारा मावळावर वचक होता. त्यावेळी जावळी चा प्रदेश चंद्रराव मोरे यांच्या कडे होता. 'चंद्रराव' ही आदिलशाह ने दिलेली पदवी होती. हा चंद्रराव मोरे महाराजांमुळेच गादी वर बसला होता पण तो पुढे महाराजांना जुमानेना. मनमर्जी कारभार करू लागला तेंव्हा महाराजांनी जावळी वर हल्ला केला. मोठे युद्ध झाले.चंद्रराव मोरे पळून रायगड किल्ल्यावर गेला. महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. पण बारा मावळावर कारभार करण्यासाठी या भागात कोणता ही सुरक्षित किल्ला नव्हता हे महाराजांनी हेरले आणि त्यांनी ठरवले कि या जावळी खोऱ्यात किल्ला हवा.त्यांनी मोक्याच्या जागेचा शोध घेतला असता त्यांना एक उत्तम डोंगर सापडला. त्या डोंगराचे नाव भोरप्या डोंगर.
भोरप्या डोंगरावर किल्ल्याची जागा निवडली गेली आणि गडाचे बांधकाम मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांच्या कडे सोपविण्यात आले. इ.स. 1656-1658 या काळात किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. जावळी ला मजबूत, भक्कम असा गडकोट मिळाला.
प्रतापगडावर एकूण 6 बुरुजांचे अवशेष सापडतात त्यांची नावे पुढील प्रमाणे यशवंत बुरुज, केदार, रेडका, अफझल, सूर्य बुरुज आणि राज पहारा. सध्या आपल्याला केवळ या बुरुजांचे अवशेष बघण्यास मिळतात. बुरुजाची उंची प्रत्येकी 10 ते 15 मीटर इतकी आहे.
प्रतापगड ओळखला जातो तो शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीसाठी आणि युद्धासाठी. आदिलशहा च्या हुकमानुसार स्वराज्यावर अफजल खान मोठी फौज घेऊन चालून आला. हा अफजल खान अतिशय क्रूर, दगाबाज आणि पराक्रमी सरदार म्हणून ओळखला जात असे. या मोहिमेपूर्वी त्याने कर्नाटक आणि दक्षिण भारतात मोठा पराक्रम केला होता. दगाबाजी करून अनेक राज्ये त्याने बुडविली होती.
तो येत होता महाराजांचं छोटंसं राज्य आपल्या पायदळी तुडवायला. अंदाजे 20,000 हून अधिक घोडदळ, 15,000 पायदळ, 1,500 शिपाई, 80 तोफा,1,200 उंट आणि 85 हत्तींसह वार्ड भागात
पोहोचला. महाराजांना जेव्हा हि बातमी समजली तेव्हा त्यांनी प्रतापगड जवळ केला. आपली आई, आजारी बायको,लहान शंभू राजे असा वैयक्तिक संसार बाजूला ठेवून ते स्वराज्य रक्षणासाठी प्रतापगडावर आले होते. खानाने महाराजांना किल्ल्यावरून बाहेर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मंदिरे फोडली, जनता लुटली गेली, तुळजा भवानी ची मूर्ती सुद्धा त्या क्रूर माणसाने सोडली नाही.पण त्याला महाराजांना किल्ल्यावरून बाहेर आणता आलं नाही
शेवटी दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या बऱ्याच भेटीगाठी नंतर शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये 9 नोव्हेंबर 1659 रोजी ऐतिहासिक भेटीचा दिवस ठरला
भेटीच्या अटीनुसार हि भेट सशस्त्र असणार होती आणि सोबत 10 अंगरक्षक एका बाणाच्या अंतरावर ठेवायची मुभा होती.भेटीसाठी उभारलेल्या शामियाना मध्ये दोन्ही बाजूचे वकील आणि क अंगरक्षक असे भेटीच्या अटींचे स्वरूप होते.
या भेटीत अफजल खानाने महाराजांना आलिंगन दिले आणि दगा करून महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सावध असलेल्या महाराजांनी अफजल खानाचा कोथळा च फाडला. मोठा विजय मिळवला.
महाराजांचा हा नृसिंह अवतार त्यादिवशी प्रतापगडाने पाहिला आणि अनुभवला. हा प्रतापगड आजही त्या पराक्रमी दिवसाची आठवण करून देतो.
संभाजी महाराजांच्या मृत्यु नंतर झुल्फिकार
खानाने रायगडाला वेढा दिला होता. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज गडावरून निसटून जिंजीला जात असतांना प्रतापगडावर त्यांनी आसरा घेतला होता.
इ.स. 1778 मध्ये नाना फडणीसांनी काही काळ सखाराम बापूंना या गडावर नजरकैद करून ठेवले होते. इ.स. 1796 साली दौलतराव शिंदे आणि बाळोबा कुंजीर जेंव्हा नाना फडणीसांवर चाल करण्याच्या उद्देशाने आले त्यावेळी नाना प्रतापगडावर आश्रयाला थांबले होते अशी माहिती मिळते .
पुढे ब्रिटीश आणि मराठ्यांमध्ये झालेल्या युद्धानंतर 1818 ला या गड ब्रिटीशांनी ताब्यात घेतला.
1957 साली या प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 5 मी. उंच असा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन प्रधानमंत्री पंडित
जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते नोव्हेंबर 1957 ला करण्यात आले.
प्रतापगड किल्ल्यावर कसे जायचे | How to reach Pratapgad fort
प्रतापगडावर आपण पुणे आणि मुंबई या दोन्ही मुख्य ठिकाणांवरुन जाऊ शकतो. प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वर पासून 25 किलोमीटरवर आहे. महामंडळाची नियमित बस सेवा महाबळेश्वर येथून असते.@AnandShidtureVlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: