मा. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाने तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक आणि पारदर्शक नेतृत्व गमावले
Автор: Balasaheb Thorat
Загружено: 2025-12-11
Просмотров: 139
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या आकस्मिक निधनाने देशाने तत्त्वनिष्ठ, शांत, प्रामाणिक आणि पारदर्शक नेतृत्व गमावले आहे.
स्थानिक राजकारणातून प्रवासाला सुरुवात करून त्यांनी महाराष्ट्र विधानसभेपासून ते सात वेळा लोकसभा सदस्य म्हणून राष्ट्रीय पातळीवर भक्कम ठसा उमटवला. अभ्यासू वृत्ती, संतुलित विचार आणि लोकशाही प्रक्रियेवरील त्यांची अखंड निष्ठा यामुळे ते सर्वपक्षीय मानाचे नेते ठरले.
भारताचे गृहमंत्री म्हणून त्यांनी देशाच्या सुरक्षाविषयक निर्णयांमध्ये जबाबदारी, संयम आणि सखोल विचारांची दिशा दिली. त्यानंतर पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड प्रशासक म्हणून लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि कायदा-सुव्यवस्थेत त्यांनी आदर्श कामगिरी बजावली.
काँग्रेसची विचारसरणी पुढे नेणे, पक्षाला बळ देणे आणि लोकशाही संस्थांना मजबुती देणे ही त्यांची आयुष्यभराची भूमिका होती. राजकीय आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांनी भूषविलेले प्रत्येक पद त्यांनी अतिशय प्रभावीपणे आणि जबाबदारीने निभावले.
लातूरचे पालकमंत्री असताना दिल्लीमध्ये त्यांच्यासोबत जवळून काम करण्याचा अनुभव आला. तेव्हा त्यांची जीवनातील शिस्तबद्धता जवळून अनुभवता आली. त्यांचे शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि अत्यंत साधेपणाचे जीवन हे खऱ्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाचे आदर्श मानदंड आहेत. देशाने अशा शिस्तबद्ध नेतृत्वाकडे आदर्श म्हणून पाहिले पाहिजे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. शोकाकुल कुटुंबीयांना धैर्य लाभो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: