मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक | Mangesh Kalokhe Murder Case
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-27
Просмотров: 47246
खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी रवींद्र देवेकरचा मुलगा धनेश देवकर याच्यासह आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत एकूण सात आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान, या हत्येवरून रायगडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी 'मंगेश काळोखे हत्येचा कट सुनील तटकरेंच्या घरी शिजला', असा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच 'रायगडचा आका हा सुनील तटकरे आहे', असंही ते म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 'जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे', असं म्हणत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उपमुख्यमंत्री खोपोलीत दाखल झाले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
#MangeshKalokhe #KhopoliMurder #MahendraThorve #SunilTatkare #RaigadPolice #CrimeNews #MaharashtraPolitics #SaamTV #ShivSena #NCP #JusticeForMangesh #RaigadNews #PoliticalCrime #Investigation #Khopoli
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: