नव्या शैक्षणिक वर्षात स्वागत - शिकू या NEET
Автор: SAMARTH BIOLOGY TUTORIALS LATUR
Загружено: 2025-06-18
Просмотров: 123
शिकू या NEET - नवे शैक्षणिक वर्ष
अकरावी बारावी आणि नीट परीक्षेसाठी पुन्हा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
जीवशास्त्र विषय घेऊन आपल्या ज्युनिअर कॉलेजच्या उंबरठ्यावर पाऊल टाकण्याचा हा काळ आहे.
गतवर्षी NEET परीक्षेत अनपेक्षित किंवा साधारण चुकांमुळे पुनर्प्रयास करणारे विद्यार्थी असतील.
हा तसा ऊर्जासंपन्न कालखंड आहे.
उत्साह आणि एकाग्रता या काळात चरमसीमेवर असतात.
आणि हळूहळू आपल्यातल्या आरंभशूरपणाची आपल्याला जाणीव होऊ लागते.
सुरुवात कशी दणक्यात होते.
परंतु एखाद्या विकेंड टेस्ट मध्ये पडलेले मार्क्स आपल्याला पुन्हा एकदा त्या न्यूनगंडाच्या भोवऱ्यात आणून टाकतात.
बरं, आपल्या शिकवणी आणि कॉलेजचे तास, यामध्ये जाणारा बहुतांश वेळ आपल्याला स्वयं-अभ्यासासाठी वेळ मिळत नाही, याची जाणीव करून देतो. मग आता उरलो "विकेंड टेस्ट पुरता" अशी आपल्या अभ्यासाची परिस्थिती होऊन जाते.
या "नेमेचि येतो पावसाळा" प्रमाणे घडणाऱ्या प्रकाराला आपण एक चांगली दिशा देऊ शकतो.
सातत्य, ध्येयनिश्चिती आणि प्रयत्नांमधून !
सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: