Pen Koliwada Holi 2025 | Pen-Raigad पेण कोळीवाडा होळी 2025 | सर्वात उंच होळी
Автор: Jara hatake
Загружено: 2025-03-14
Просмотров: 3348
Pen Koliwada Holi 2025 | Pen-Raigad पेण कोळीवाडा होळी 2025 | सर्वात उंच होळी
Milind Khot | Jara Hatake
गणेशोत्सवाप्रमाणेच होळी (Holi 2025) हा देखील कोकणातील महत्वाचा सण समजला जातो. त्यामुळे होळी या सणाची जय्यत तयारी पेणमध्ये सुरू झाली आहे. त्यामध्ये पेण शहरातील कोळीवाड्यातील (Pen Koliwada Holi) व ग्रामीण भागातील गगनचुंबी होळी संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रचलित आहेत. खऱ्या अर्थाने होळी सणापासून कोकणातील सणांना (Konkan Holi) सुरुवात होत असते.
पेण कोळीवाड्यात एक वेगळाच उत्साहाचा आणि आनंदाचा वातावरण पहायला मिळतो. अगदी होळी आणण्यापासून ते होळी उत्सव साजरा होईपर्यंत या कोळीवाड्यात एक वेगळाच साज चढलेला पहायला मिळतो. होळीच्या दिवशी सर्व कोळी बांधव आपला पारंपरिक पेहराव करून आणि महिला वर्ग लुगडी, साड्या नेसून अंगभर दागदागिने परिधान करून त्या पारंपरिक ढोलकीच्या तालावर आणि संगीताच्या ठेक्यात होलिकामाते सभोवती नाचगाणी गात आपला आनंद साजरा करत असतात. पेण कोळीवाड्यातील हा आनंदाचा आणि पारंपरिक संस्कृतीचा क्षण पाहण्यासाठी हजारो नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
Koliwada holi 🚩 #maharashtra #holi #shimga2025 #jarahatake #shorts #pen #koliwada #raigad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: