श्री. मतोबा महाराज यात्रा उत्सव 2025
Автор: Maharashtrachi Shaan
Загружено: 2025-01-15
Просмотров: 568
नैताळे येथील आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाला 13 जानेवारी पासून सुरुवात झाली.
श्री मतोबा हे सातपुडा पर्वत (सध्याचा सापुतारा) ओलांडून या 'नैताळे' या गावी वास्तव्यास आले, त्यांनी या गावचे पाटील पदाजी बोरगुडे यांच्याकडे गुराख्याची चाकरी धरली. श्री मतोबा महाराजांची मुक्या प्राण्यावर फार माया होती. गाई, गुरे चारत-चारत ते विंचू सुध्दा आपल्या अंगा खांद्यावरून खेळवू लागले. त्यांचा हा रोजचा खेळ पाहून त्याची चर्चा गावात व आसपासच्या खेड्यातही होऊ लागली. कुतूहलाने त्यांना पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येऊ लागले.
त्यांच्या हाताच्या स्पर्शाने विष उतरू लागले, त्यांनी विषारी सर्प दंश झालेले लोक बरे केले. त्यांनी दिलेल्या विभूतीने असह्य रोग बरे होऊ लागले. त्यांच्या कार्याची महिमा वाढत जाऊन पुढे बराच काळ निघून गेल्यावर त्यांनी याच गोठ्यात जिवंत समाधी घेण्याचा प्रस्ताव पदाजी पाटलांकडे मांडला. तेव्हा सर्वांचे अश्रू अनावर झाले पण महाराजांनी सांगितले कि "जन्माला आलेला व्यक्ती कधीतरी या जगाचा निरोप घेणारच ! मृत्यूच या जगातील प्रखर सत्य आहे. तेव्हा आपण दुःख मानण्याचे काहीच कारण नाही. माझा कार्यकाळ संपलेला आहे. आता हा वारसा गावक-यांनी जपायचा आहे!" असे त्यांनी सांगितले.
त्यांनी पौष पौर्णिमेचा दिवस निवडला आणि याच दिवशी शेष नागाला साक्षी ठेऊन जिवंत समाधी घेतली. पुढे याच जागी त्यांचे मंदिर बनवले गेले, तेव्हापासून तर आज पर्यंत दरवर्षी पौष पौर्णिमेला त्यांचे पुण्य स्मरण म्हणून यात्रोस्तव भरतो, तो १५ दिवस चालतो. महाराजांच्या प्रतिमेची पहाटे विधिवत पूजा केल्यानंतर प्रतिमेच्या मिरवणुकीसाठी बैल गाडीचा रथ सजवला जातो. खानदेशातून सुध्दा भाविक आपली बैलजोडी बाबांच्या रथाला जुंपण्यासाठी आणतात, हे दृश्य पहाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
(काळाच्या ओघात नऊ तळे नामशेष झाले आहेत.)
या देवस्थानाविषयी तुम्हाला माहीत होते का??
माहीत असल्यास Comment नक्की करा ..
#naitale
#मेला
#Nashik
#niphad
#MatobaMaharaj
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: