लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात | Majhi Ladki Bahin Yojana
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-03
Просмотров: 61875
महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. ‘पात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण करुन घ्यावी,’ असे आवाहन अदिती तटकरेंनी केले आहे. ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले होते, त्यांना या बातमीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. योजनेचा लाभ नियमितपणे मिळवण्यासाठी सर्व पात्र महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
#MajhiLadkiBahinYojana #AditiTatkare #Maharashtra #SaamTV #GovScheme #WomenEmpowerment #DBT #KYC #FinancialAid #MaharashtraNews #BreakingNews #LadkiBahinScheme #WomenWelfare #EknathShinde #DevendraFadnavis
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: