Peanut Chikki | शेंगदाणा चिक्की
Автор: Pratibha Gujar
Загружено: 2024-12-15
Просмотров: 227
@Jyoti_kitchen88
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज शेंगदाणा चिक्की ची रेसिपी शेअर केली आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य=
भाजलेले शेंगदाणे -१ वाटी
गुळ -१ वाटी
तुप - १ चमचा
विधी =
पोळपाट व लाटणं लाल तुप लावणे.
भाजलेले शेंगदाणे चे सालपट काढून ते हाताने रगडून एकातून दोन असे केले आहे. गुळ कट केला तुम्ही गुळ पावडर देखील वापरु शकता.कढईत १ चमचा तुप घालून त्यात वरील दिलेल्या प्रमाणात गुळ घालावे.बारिक गॅसवर गुळ पगळत ठेवा.सारखे गुळाच्या पाकाला ढवळत राहावे.२-५ मी.नंतर गुळाचा पाकाचा रंग डार्क झाल्यावर वाटी त पाणी घ्यावे व त्यात थोडे पाक सोडून ते तुटते का ते पहा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे करून पाकाचा तुकडा पडत असल्यास लगेच बारीक गॅसवरच पाकात शेंगदाणे घालून ते सगळे मिश्रण एकजीव होईपर्यंत परतावे व पोलपाटवर सोडून ते गरम गरम लाटून वड्या पाडाव्यात व १/२ घंटा साठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.मिश्रण थंड झाल्यावर चाकूने अलगत काढावी.शेंगदाणा चिक्की तयार झाली.खायला घ्यावे.
धन्यवाद 🙏🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: