हिंगलाय देवी दर्शन _Mini vlog_5
Автор: Saste Vloger's
Загружено: 2023-09-01
Просмотров: 217
वेसावची ग्राम दैवत आई हिंगळा देवी माता ---- मुळ शक्तीपीठ - पाकिस्थानातील बलुचीस्थान प्रांतात "नानी का हज" - हिंग्लाज माता
*"वेसावा कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी*🙏🏻 🌼🌼🌼🌼🌼🌼🙏🏻
*"हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी, तु उभी हास वेसावे गावानु!"*....... होय, वेसावकर आणि मंडळी ह्या कोळी गीतांच्या समुहाने रचलेले हे सुप्रसीद्ध भक्तीमय कोळीगीत वेसावकरांची ग्रामदैवत असलेल्या आई हिंगळा देवी (जगप्रसीद्ध शक्तीपीठ - हिंग्लाज माता, बलुचिस्थान, पाकिस्थान हीचेच एक प्रतीरूप) हिच्यावर आधारीत आहे.
कोळी जमात हि एक आदिम जमात असुन, मुळातच शिव-शक्ती उपासक🙏🏻 म्हणुन प्रत्येक कोळीवाड्यात अथवा आदिवासी पाड्यात तुम्हाला एक तरी देवीचे (गावदेवीचे) मंदिर अथवा स्थान सापडेल. मग गावातील कुठलेही शुभ कार्य, दुखाःचे सावट किंवा पारंपारीक व्यवयाय-मासेमारीशी निगडीत गोष्टी असो, अश्या प्रसंगी कुलदेवते बरोबरच वेसावकरांना आठवण येते ती म्हणजे त्यांच्या हिंगलाय आईची 🙏🏻 आपल्या मनातील आशा-आकांक्षा वेसाव्यातील कोळी बांधव आवर्जुन आपल्या हिंगळा देवीला सांगीतल्या शिवाय राहत नाही. दररोज सकाळी बाजारात जाउन आपल्या मासेविक्रीच्या पारंपारीक व्यवसायाला सुरूवात करण्यापुर्वी वेसावकरीण कोळी महिला आवर्जुन हिंगळा देवीच्या मंदिरात जाउन प्रार्थना करते🙏🏻 तसेच येता जाता एखाद्याचे हिंगळा आईच्या मंदिरातील मोहक ममता पसरवणार्या सुंदर मुर्तीकडे लक्ष जाउन आपोआप हात जोडले गेले नाहीत तर नवलच! हिंगळा देवी म्हणजेच भारत व परिसरातील देवींची जाग्रुत शक्तिपीठांमधले एक प्रमुख पीठ *हिंगलाज माता*.
#hinglajmaastatus#hinglajmaa#aagrikoli#aagrikolistatus#ekviramauli
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: